Rohit Pawar : ‘जरांगे पाटलांची भूमिका योग्यच, सरकार झोपले होते का?’ रोहित पवारांचा रोखठोक सवाल
NCP MLA Rohit Pawar Criticized State Government over Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकार सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करत आहे. तेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले होते. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्यच आहे. आतापर्यंत तुम्ही झोपला होता का, असा सवाल रोहित पवार यांनी सरकारला विचारला आहे.
Manoj Jarange : ‘दादागिरी करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा’ जरांगेंचा सरकारला इशारा
रोहित पवार म्हणाले, जरांगे पाटील यांची भूमिका योग्यच आहे. आंदोलन केल्यानंतरच सरकार जागे होते. जरांगे पाटील ज्यावेळी मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा सरकारची धावपळ सुरू झाली. इतके दिवस तुम्ही झोपला होतात का ? समाजाला फसवता का?, चेष्टा का करता? असे सवाल रोहित पवार यांनी केले. सरकारला मराठा समाजाची फक्त फसवणूक करायची आहे. लोकसभा निवडणूक कशीतरी काढायची आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी राज्य सरकारवर केला.
सरकारने आता योग्य कार्यवाही करून या प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज आहे. आता सात दिवसांत सगळी माहिती तुमच्याकडे कशी येणार. सर्व्हे घाईगडबडीत होत नसतात. सर्व्हे आधीच करायला पाहिजे होता, अशी टीका रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांनी अजित पवार गटावरही टीका केली. खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिज्ञापत्रात शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख हुकूमशाहा केला होता. यावर रोहित पवार म्हणाले, ज्यांनी या लोकांना मोठे केले. आज त्यांच्याच विरोधात उभे राहिले आहेत आणि सगळे विसरून गेले, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
Rohit Pawar : ‘राष्ट्रवादी’चा निकाल अजितदादांच्या विरोधात? रोहित पवारांनी नेमकं काय सांगितलं