“मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या”, गडकरी बावनकुळेंना असं का म्हणाले?

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari) आज नागपुरात भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक जुनी आठवण सांगितली. मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या. आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढं तिकीट द्या म्हणत लोक येतील तेव्हा बावनकुळेंना कळेल माझ्यावरही हे बेतलं होतं, असा अनुभव नितीन गडकरी यांनी सांगितला.
गडकरी पुढे म्हणाले, पक्षाची स्थापना करताना आपण काही उद्दिष्टं बाळगली होती. ही उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या कार्यालयासाठी कम्यूनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेचं कार्यालय आपण विकत घेतलं. पक्षाचे कार्यकर्ते गिरीश व्यास यांनी जागा दिली. येथे काही भाडेकरू होते. त्यांच्याशी बोलून ही जागा आता मोकळी झाली आहे.
आपल्याकडे एक म्हण आहे की मुर्ख लोक जागा बांधतात आणि शहाणे माणसं किरायाने राहतात. याचा उत्तम अनुभव या कार्यालयाच्या जागेतून किरायेदार खाली करताना आला. मध्यंतरी देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आता ही जबाबदारी तुम्ही तुमच्या हाती घ्या. त्यानंतर आसपासच्या काही जागा घेण्यात आल्या आणि आज या कार्यालयाचं भव्य स्वरुप आपल्यासमोर येणार आहे.
जिल्ह्यातील ‘त्या’ रस्त्याच्या कामासंदर्भात लंकेचे मंत्री गडकरींना साकडे
आपला पक्ष हा आपला परिवार आहे आणि कार्यकर्ता हा आपल्या परिवारासारखा आहे असे समजून नेत्यांनी वागले पाहीजे. नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच. ते सांगायची गरज नाही. त्यालाच तिकीट द्या असे सगळेजण म्हणत असतात. मी माझ्या मुलाचा कधीच आग्रह करत नाही त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं.
त्यामुळे आपण आपल्या मुलावर जितकं प्रेम करतो तेवढच प्रेम जर आपण आपल्या कार्यकर्त्यांवर केलं. त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषांसह स्वीकारलं. त्यांचं काही चुकलं तर त्यांना एकट्यात या गोष्टी सांगितल्या पाहीजेत. त्या कार्यकर्त्यावर आपल्या परिवारासारखं प्रेम केलं पाहीजे. कार्यालयात सर्व सुविधा असतील पण कार्यकर्ता आणि नेत्यातलं माणूसपण राहिलं पाहीजे अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या
मी बावनकुळे यांना सांगितलं मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या. जातीचे सेल उघडून फायदा नाही. जातीचे सेल करुन कुठल्या जाती जुळल्या नाही. ज्या जातीच्या नेत्याला आपण घेतलं. त्या लोकांना जातीनं स्वीकारलं नाही. आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढे तिकीट द्या म्हणून लोक येतील, तेव्हा बावनकुळे यांना कळेल. माझ्यावर हे बेतलं आहे, असा खास अनुभव नितीन गडकरी यांनी सांगितला.
Gadkari: नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘गडकरी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित