नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना विधानसभेतून आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात कमालीचा धक्कादायक ठरला आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप हे दोघेही आजपासून आक्रमक झाल्याचे दिसून आले. दिशा सलियान मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले. […]
नागपूर : लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केलीय. पटोले म्हणाले की, […]
नागपूरः भूखंडाच्या आरोपावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले आहे. आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घेतले खोके, भूखंड ओके अशी नवी घोषणाही यावेळी देण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून भूखंडावरून मुख्यमंत्र्यांवर महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला आहे. सभागृहाच्या बाहेरही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना घेरण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाबाहेर विरोधकांकडून […]
अमरावती : येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे प्रकरणात नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात एनआयएकडून 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळंच उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती, असा मोठा खुलासा एनआयएकडून करण्यात आलाय. एनआयएकडून सांगण्यात आले की, ज्या व्यक्तीने उमेश कोल्हेंची हत्या केली, तो तबलिगी जमातचा होता आणि पूर्णपणे […]
नागपूर : ‘टीईटी’ घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात […]
नागपूरः ८३ कोटींचा भूखंडावरून मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी मंगळवारी घेरले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेत. आज विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरत सरकार, मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार, अश्या घोषणाही देण्यात आल्यात. 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना देणे म्हणजे मंत्रिपदाचा दुरुपयोग तत्कालीन नगरविकास मंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केला […]