दोन्ही जिल्ह्यांतील आमदार-खासदारांच्या कुंडल्या माझ्याकडे; पटेलांचा जाहीर भाषणातून थेट इशारा

दोन्ही जिल्ह्यांतील आमदार-खासदारांच्या कुंडल्या माझ्याकडे; पटेलांचा जाहीर भाषणातून थेट इशारा

Praful Patel : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं तसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटे (Praful Patel) यांनी एका कार्यक्रमांत बोलतांना विरोधी पक्षांच्या नेत्यांना गंभीर इशारा दिला. दोन्ही जिल्ह्यातील आमदार-खासदारांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, असं म्हणाले.

रामदास कदमांनी दुसऱ्या मुलालाही ‘सेट’ केलं… CM शिंदेंकडून MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाद गोंदियातील जनतेसह राज्यातील जनतेला नवा नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना प्रफुल्ल पटेलांनी पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. पटोले यांचे नाव न घेता, दोन्ही जिल्ह्यातील आमदार-खासदारांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, असा थेट इशाराच पटेलांनी दिला आहे. दरम्यान, असे वक्तव्य करताना व्यासपीठावर उपस्थित आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे कटाक्ष टाकत एक प्रकारे त्यांनाही आपल्यासोबत राहण्यात फायदा आहे, अशी समजसुध्दा या इशाऱ्यातून दिल्याचं जाणवलं. त्यामुळं पटेल यांचे भाषण सध्या चांगलेच चर्चेत आहे.

‘2047 साल उरावर बसवं आधी गरीबांना दोन घास दे’; ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात 

भेल प्रकल्पाची ‘भेलपुरी’ झाली
प्रफुल्ल पटेल आणि आमदार नाना पटोले यांच्यातील ‘वाद’ सर्वश्रुत आहे. दोघांनाही एकमेकांचा विरोध करण्याची संधी मिळाली तर दोघेही एकमकेकांची कोंडी करण्याची एकमेकांना अडचणीत पकडण्यचाी संधी सोडत नाहीत. तसेच आजही सडक अर्जुनीच्या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या मेळाव्यात बोलतांना आपण जिल्ह्यासाठी काय काय केले, यांची पावती देतांना पटेलांनी पटोले यांचं नाव न घेता, जिल्ह्यासाठी त्यांचे योगदान काय, असा सवाल केला. नाना नुसते जिल्ह्यात फिरत असून मोठा नेता म्हणून उदयास येत असल्याची टीकाही पटेल यांनी केली आहे. भेल प्रकल्पाची ‘भेलपुरी’ झाली तरी प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. मात्र हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू, असे पटेल म्हणाले. जो आपल्या तालुक्याचा विकास करू शकला नाही तो जिल्ह्याचा विकास कसा करणार? कोणाची काय औकात आहे, हे लोक जाणतात, असंही पटेलांनी सुनावलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांना सोडून शरद पवार गटात दाखल झाले आहेत. हे प्रफुल्ल पटेल यांना माहीत आहे. त्यामुळे जे प्रफुल्ल पटेलांना सोडून गेले, आणि जे जाण्याच्या विचारता असतील तर त्यांच्या कुंडल्या माहित असल्याची इशारा पटेलांनी दिला.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube