‘2047 साल उरावर बसवं आधी गरीबांना दोन घास दे’; ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात

‘2047 साल उरावर बसवं आधी गरीबांना दोन घास दे’; ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात

Udhav 2047 साल तुझ्या उरावर बसवं आधी गरीबांना दोन घास दे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा (Loksabha Election) निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या कुटुंब संवाद सभा पार पडत आहेत. लातूरमधील औसामध्ये आज सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

Devendra Fadanvis : पत्नीनंतर फडणवीसही गाण्यात मागे नाही; महाशिवरात्रीनिमित्त फडणवीस लिखित ‘देवाधि देव’ रिलीज

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपकडून नेहमीच काँग्रेस पंडित जवाहरलाल नेहरु यांनी काय केलं, देश लुटला, अशीच टीका होत आहे. हे लोकं शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यावर त्यांच्या मागे लागतात. घरांवर जप्ती आणतात, त्यानंतर शेतकरी आत्महत्या करतात. पण निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या तिजोरीत 6 ते 7 हजार कोटी रुपये आले आहे. आधीच्या काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या तिजोरीत 600 ते 700 कोटी आले तर मग आता देशाला कोणी लुटलं हे सांगा? असा उपरोधिक सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.

जागा वाटपाच्या तहात शिंदे फसले… 23 जागा कायम ठेवत ‘ठाकरेंनी’ दाखवली सुपर पॉवर…

तसेच मागील दहा वर्षांत जे काँग्रेसने नाही केलं ते तुम्ही करुन दाखवलं आहे. 2047 सालाचं स्वप्न हे लोकं जनतेला दाखवत आहेत. पण 2047 साल तुम्ही तरी बघणार आहात का? आज रात्री गरीबाच्या घरात दोन घास दे 2047 साल घाल तुझ्या उरावर बसवं, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.

Jayant Patil : “शरद पवारांची ताकद मोठी म्हणून अमित शाह”… जयंत पाटलांचं सणसणीत उत्तर

तर मोदी दिसलेच नसते…
शिवसेनेचे आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल असं त्यांना वाटलं पण शिवेसना भाजपला मातीत गाडून पुढे जाईल. ज्यावेळी मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. बाळासाहेब होते म्हणूनच मोदी दिसत आहेत आम्हाला मोदींचं कौतूक काय सांगता कट्टर शिवसैनिक आम्हाला पुरेसे आहेत. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या डब्यात टाकायला निघाले तेव्हा बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदी दिसलेच नसते, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube