‘फडणवीस सत्तेच्या नशेत, सत्तेने भ्रष्ट? इतकी मस्ती कशी’; प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांना घेरलं

‘फडणवीस सत्तेच्या नशेत, सत्तेने भ्रष्ट? इतकी मस्ती कशी’; प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांना घेरलं

Prakash Ambedkar On Devendra Fadnvis : नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या(Devendra Fadnvis) व्हायरल व्हिडिओवरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) फडणवीस यांना घेरलं आहे. फडणवीस सत्तेच्या नशेत सत्तेने भष्ट? इतकी मस्ती कशी? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरद्वारे केला आहे.

प्रकाश आंबेडकर ट्विटमध्ये म्हणाले, “सत्तेच्या नशेत? सत्तेने भ्रष्ट? की दोन्हीची इतकी मस्ती? नागपुरात पुरात अडकलेल्या ४ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे आणि त्याची दाद मागण्यासाठी गेलेल्या लोकांना इतकी तुच्छ वागणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात.

स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू, बापानं थेट आनंद महिंद्रांवर केला गुन्हा दाखल

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या सरकारचा मुजोरपणा बरेच काही सांगून जातो. खरं पाहता यात आश्चर्य काहीच नाही. हाच प्रकार मी अगणित वेळा बघितला आहे. कित्येक वर्षांपासून अकोला देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मुजोर वृत्तीचा शिकार आहे.” असं ट्विट आंबडेकरांनी केलं आहे.

Kiran Mane Post: ‘अखेर स्वप्न सत्यात उतरलं.. ‘,किरण माने यांनी खरेदी केली आलिशान कार

दरम्यान, नागपूरच्या पूरस्थितीच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस गेले होते. पाहणीच्यावेळी नागपुरातील एका व्यक्तीसोबत अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांची टीकेची तोफ डागली आहे.

Oscar 2024 : फिल्म फेडरेशनकडे ऑस्करसाठी दे केरळ स्टोरीसह ‘हे’ 22 चित्रपट दाखल, पुढच्या आठवड्यात अंतिम घोषणा

अकोला जिल्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वृत्तीचा शिकार झाल्याचा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नागपुरात झालेल्या पावसामुळे अनेकांना या पुराचा अर्थिक फटका बसला आहे. पुरामुळे अनेकाचं मोठं अर्थिक नूकसान झालं, त्या दिवशी फडणवीस आणि अमित शाह मुंबई दौऱ्यात व्यस्त असल्याचंही आंबेडकर म्हणाले आहेत.

नागपुरात पुरात अडकलेल्या चार निष्पाप लोकांचा बळी गेला असून या प्रकरणी दाद मागण्यास गेलेल्या लोकांना देवेंद्र फडणवीस यांनी तृच्छ वागणूक दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसचे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या सरकारचा मुजोरपणा बरेच काही सांगून जातो. प्रामाणिकपणे मला याचं आश्चर्य वाटत नाही. हे मी असंख्य वेळा पाहिले आहे. वर्षानुवर्षे अकोल्यात, तर त्यांच्या पालकत्वाखाली आणि भाजपच्या प्रतिनिधित्वाखालील त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या उदासीन आणि मुजोर वृत्तीचा अंत झाला असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube