बंदुकधारी पोलिस कर्मचाऱ्याने अचानक दाबला ट्रिगर अन्…

बंदुकधारी पोलिस कर्मचाऱ्याने अचानक दाबला ट्रिगर अन्…

नांदेड : अचानक बंदुकीचा आवाज झाला की,आपण बावरतो. इकडं तिकडं पाहत असतो. असाच एक प्रकार नांदेडात घडलाय. एका बंदुकधारी पोलिस कर्मचाऱ्याच्या हातून चुकून ट्रिगर दबला गेला आणि धाडकन गोळी चालल्याचा प्रकार घडलाय. दरम्यान, अचानक गोळीच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपींना नांदेड कारागृहातून न्यायालयात पोलिस बंदोबस्तात घेऊन जावे लागतं. तसेच न्यायालयातून पुन्हा कारागृहातून आणावे लागते. अशावेळी पोलिसांना बंदुक जवळ बाळगावी लागते.

Ghulam Nabi Azad : काँग्रेस रिमोट कंट्रोलने चालवली जातेय, राहुल गांधी काँग्रेसचे कॅप्टन

आज बुधवारी सकाळी अकरा वाजता पोलिस मुख्यालयात कर्तव्य बजावत असलेले पोलिस उपनिरीक्षक के.एच. आरेवार आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी कारागृहात गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत राईटर गिते आणि पोलिस कर्मचारी होते.

Shivendra Raje : शिवेंद्रराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीला उमेदवार सापडला

कारागृहाच्या आत जात असताना पोलिसांना बंदूक नेण्याची परवानगी नसते. त्यामुळे आरेवार यांनी आपल्या जवळील बंदूक राईटर गीते यांच्याकडे दिली. त्यानंतर जरांडे यांनी ही बंदूक घेऊन हाताळण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान बंदूकीचा ट्रिगर अचानक त्या कर्मचाऱ्याकडून दबला गेला आणि बंदुकीतून सुटलेली गोळी थेट जमिनीला लागली. सुदैवाने गोळी जमिनीला लागल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube