Shivendra Raje : शिवेंद्रराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीला उमेदवार सापडला

  • Written By: Published:
Shivendra Raje : शिवेंद्रराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीला उमेदवार सापडला

शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या सातारा (Satara) जिल्हातील जावळी तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती. पण युवा नेते अमित कदम (Amit Kadam) भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश करत असल्यामुळे जावळीत पुन्हा राष्ट्रवादीला राजकीय ताकद मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर अमित कदमांचा हा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याचे बोलले जात आहे.

अमित कदम यांचा येत्या रविवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत आहे. भाजपात सक्रिय होण्यापूर्वी अमित कदम राष्ट्रवादीमध्येच सक्रिय होते. २०१७ मध्ये राष्ट्रवादीमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. येत्या रविवारी ९ एप्रिलच्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे.

Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादी मधून भाजपात गेल्यानंतर जावळीमधील राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती. दीपक पवार यांच्याशिवाय दुसरं नाव राष्ट्रवादी नव्हतं, पण अमित कदम यांच्या प्रवेशामुळे आता राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. त्यामुळे कदम यांचा हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

कोण आहेत अमित कदम?

अमित कदम यांची राजकीय कारकीर्द पंचायत समिती सदस्य म्हणून सुरु झाली. पुढे जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील ते निवडून आले. या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदाचा काम देखील पाहिले आहे.

…म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या, अमित शाह यांच्याकडे खासदारांची मागणी

अमित कदम हे उदयनराजे भोसले यांचे समर्थक मानले जायचे. २०१७ साली राष्ट्रवादीमधून भाजपात प्रवेश केला. पण पुढे शिवेंद्रराजे हे देखील भाजपात आले. परिणामी त्यांना पक्षात असूनही फारसे काम करता आले नाही. गेल्या काही महिन्यापासून कदम राष्ट्रवादी प्रवेशाची वाट पाहात होते. आता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सातारा, जावळी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube