ज्याला फडतूस बोललो होतो, तोच का? Udhhav Thackery यांच्याकडून फडणवीसांची खिल्ली

ज्याला फडतूस बोललो होतो, तोच का? Udhhav Thackery यांच्याकडून फडणवीसांची खिल्ली

Udhhav Thackery Criticize Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकांच्या ( Lok Sabha Election ) प्रचारासाठी सर्वच पक्ष जोरात कामाला लागले आहेत. यामध्ये आज ( 21 एप्रिल ) उद्धव ठाकरे ( Udhhav Thackery ) यांनी बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर ( Devendra Fadanvis ) टीका केली.

कोट्यावधींचं सोनं, चांदी अन् हिरे… नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?

यावेळी ठाकरेंच्या भाषणादरम्यान प्रेक्षकांमधून आवाज येत होता त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, तुम्ही टरबुज म्हणाले म्हणून मी म्हटलो. पण मला माहित नाही तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात. मी ज्याला मागे फडतूस बोललो होतो. तोच का? नाही मी कलंक बोललो होतो ना? काल पण काही तरी बोललो होतो ना. पण एवढं जर माहीती असेल तर तुम्हीच बघा ना त्याच काय ते. असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली.

कोट्यावधींचं सोनं, चांदी अन् हिरे… नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?

तसेच यावेळी ठाकरे यांनी त्यांच्या प्रचार गीतावर निवडणुक आयोगाकडून घेण्यात आलेल्या आक्षेपावरून देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह धर्म आणि देवाच्या नावावर मते मागतात. मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटकात निवडणूक झाली त्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती.

पण निवडणूक आयोगाने मोदी आणि शहांना काही सूट दिली आहे का? त्यांच्यासाठी नियमांत काही बदल केला आहे का? बजरंग बलीचं नाव घेऊन मोदी बटण दाबायला सांगत असतील अगदी कचाकचा म्हणत नसतील तरी बटण दाबायला सांगत आहेत. हे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत बसते का, असा सवाल उपस्थित करत अनेकदा स्मरणपत्र देऊनही काहीच कार्यवाही झाली नाही, असे ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube