Video : दुबे मराठी माणसाला नव्हे तर, संघटनेवर बोलले; भाषिक वादात फडणवीसांनी काय सांगितलं?

  • Written By: Published:
Video : दुबे मराठी माणसाला नव्हे तर, संघटनेवर बोलले; भाषिक वादात फडणवीसांनी काय सांगितलं?

Devendra Fadnavis On MP Nishikant Dubey : मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत. मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? असे आक्रमक आणि चीड आणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या विधानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Video : मुख्यमंत्री खोटारडे, मराठी माणसांची ताकद दाखवतोच, मनसेचं थेट फडणवीसांना चॅलेंज

दुबे मराठी माणसाला नाही तर, संघटनेसंदर्भात बोलले – फडणवीस

दुबे निशिकांत दुबे यांचं जर पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्याठिकाणी म्हटलेलं नाही. तथापि, माझं मत अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितले.

महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन कोणीच नाकारू शकत नाही

ज्यावेळी परकीय आक्रमकानी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस ते जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठीचे लढले होते.

गृहखात्यावर फडणवीस यांचाच मंत्री नाराज….मला अटक करा सरनाईकांचं थेट आव्हान

आमचे अब्दालीने त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं की, मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे. तो पंजाब पासून पेशावर पर्यंत हा मूल कामाला देऊन टाका बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा असा आम्ही मान्य करून पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही. मराठीत तुम्ही मुलुख अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढायला गेले होते त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नकारात असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे.

Video : मनसेला मोर्चाला परवानगी का दिली नाही? CM फडणवीसांनी क्लिअर सांगितलं..

आमच्या पैशांवर जगता, आपटून-आपटून मारू – दुबे 

मीरारोड येथे मराठी (Marathi) न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदारावर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामुळे राज्यभरात बहुतेक स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. मनसेच्या (Raj Thackeray) आक्रमक भूमिकेनंतर हिंदीभाषकांनी ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ असे ठसठशीत वक्तव्य केलं. त्यामध्ये आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली आहे.

निशिकांत दुबे यांनी अगोदर ट्विट करत हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. असं अव्हान केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली आहे. हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची सक्ती करणारे कुणाच्या पैशांवर जगत आहेत. टाटा, बिर्ला आणि रिलायन्स हे सर्व हिंदी भाषिक आहेत. सर्व करदाते हे बिहारी, झारखंड आणि उत्तर भारतीय आहेत. आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणताही कर भरत नाहीत. तुमचा कोणताही उद्योग नाही. आमच्या झारखंड, मध्यप्रदेश, ओडिसा आणि छत्तीसगडकडे खाणी आहेत. रिलायन्सची रिफानरीही गुजरातमध्ये आहे. सेमी कंडक्टर कंपन्या गुजरातमध्ये जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube