आम्ही पवार साहेबांसोबतच…अजित पवारांच्या बंडानंतर ‘या’ आमदारांच्या प्रतिक्रिया

  • Written By: Published:
आम्ही पवार साहेबांसोबतच…अजित पवारांच्या बंडानंतर ‘या’ आमदारांच्या प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन बंड पुकारत अजित पवारांनी थेट शिंदे व फडणवीसांशी हातमिळवणी केली. तसेच आज राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी मात्र आता उर्वरित आमदार आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत अशा प्रतिक्रिया देत आहेत. मी साहेबांसोबत अशा आशयाचे ट्विट सध्या या आमदारांकडून केले जात आहे. (We are with Mr. Pawar…Reactions of ‘these’ MLAs after Ajit Pawar’s rebellion)

अजित पवारांसह या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान अजित पवार सत्ताधारी मंडळींच्या पंगतीत जाऊन बसल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेस म्हणू, काँग्रेस आणू.., अजित पवारांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस नेत्यांचं ट्विट…

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्यासोबत काही आमदार अद्यापही आहेत. यामध्ये प्रामुख्याने जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख, सुमनताई पाटील, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, सुनिल भुसारा, राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तनपुरे, अशोक पवार, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे हे आमदार अद्यापही शरद पवार यांच्यासोबत असल्याचे समजते आहे.

आमदार सुनील भुसारा म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सैनिक म्हणून पक्षासोबत कायम आहे. राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी संघटनेसोबतच राहणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube