Video : नानांचा सवाल अन् जयंतरावांचं परफेक्ट उत्तर.. ‘पॉलिटिक्स’चा हिशोब नानांनीही केला मान्य

Nana Patekar Speech : ‘किती वर्ष झाली तुला राजकारणात येऊन.. चाळीस नाही जास्तच.. 84 ला आलास ना मग ती 16 आणि ही 25 हो चाळीसच राजकारण्यांचं गणित पहिल्यांदाच एवढं बरं दिसतंय..’ नाना पाटेकरांनी विचारलेल्या प्रश्नाचं जयंत पाटलांनी (Jayant Patil) एकदम परफेक्ट उत्तर दिलं. त्यामुळे नाना पाटेकर देखील अवाक झाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे बिजनेस एक्स्पो आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होती. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रतीक पाटील उपस्थित होते.
‘वनवास’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! नाना पाटेकर अन् उत्कर्षच्या भूमिकेनं वेधलं चाहत्यांचं लक्ष
नाना पाटेकर पुढे म्हणाले, ‘आपल्याला ज्यातून आनंद मिळतो अशी गोष्ट आपण करावी. पण दु्र्दैवाने राजकारण्यांनी काही केलं तर त्याला किंमत नसते. पण अभिनेत्यांनी काही केलं तर ते अधोरेखित केलं जातं. तुझ्याशी मैत्री असणं याचा मला आनंद आहे. कारण कोणत्याही वाईट गोष्टीशी तुझं नाव जोडलं गेलेलं नाही आणि पुढेही जोडलं जाणार नाही. तू जसा आधी होतास तसाच आजही आहे उद्याही राहशील याची मला खात्री आहे.’
‘राजकारण्यांची खरी गंमत म्हणजे ते काय बोलले हे त्यांनाच दुसऱ्या दिवशी आठवत नाही. पण आम्हाला मात्र पक्कं आठवत असतं. कसं असतं ना नियती तुम्हाला कशी ढकलते. परदेशी गेलेला एक मुलगा. कुठेतरी काहीतरी अघटीत घडतं. त्यातून तो मुलगा परत येथे येतो. त्याच्यावर नियतीकडून कोणती तरी गोष्ट लादली जाते त्यानंतर त्याचा जयंत पाटील होतो’, असे कौतुकोद्गार नाना पाटेकर यांनी काढले.
Nana Patekar: ‘तिरंगा’ सिनेमातील राजकुमारसोबतच्या कामाबद्दल थेटच सांगितले; म्हणाले, दोन गुंड एकत्र
दहा ते पंधरा वर्षांची अद्याप तुझी राजकीय कारकीर्द राहिली आहे ती अशीच बहरत राहिली पाहिजे. तुझ्या वागण्या बोलण्यातलं जे सातत्य आहे त्यामुळे तू उजळ माथ्याने इथे बसू शकतो. ही जबाबदारी आता तू तुझ्या मुलालाही दिली आहे. तो त्याचं सोनं करतोय. हल्ली मुलांमध्ये व्यसनाधिनता वाढत चालली आहे. झिंग आपल्या कामाची असावी, अशा व्यसनांची नको असेही नाना पाटेकर यांनी सांगतिलं. या प्रदर्शनासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.