गोपीचंद पडळकरांविरोधात महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यानं थोपटले दंड

Gopichand Padalkar Sachin Kharat Latest News 04 09 22

सांगली : जिल्ह्यातील खानापूर आटपाडी या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर असतील तर आपण स्वतः महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास तयार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी एक व्हिडीओ शेअर करत केली आहे.

व्हिडीओमध्ये सचिन खरात म्हणाले की, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघातून 2024 ला आमदार अनिल बाबर हे उभे राहणार नाहीत तसेच 2024 ला या मतदारसंघांमध्ये भाजप पक्षाचा उमेदवार असेल असा गौप्यस्फोट केल्याची समजत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या नावावर विधानपरिषदेची भाजपाकडून आमदारकी मिळवली आणि समाजाची फसवणूक केली.

आता पुढे विधानसभेत जाण्यासाठी खानापूर आटपाडी या मतदारसंघातील जनतेची फसवणूक करतील, त्यामुळं जर खरचं गोपीचंद पडळकर खानापूर आटपाडी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असतील तर त्यांच्याविरोधात आपण स्वतः महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढण्यास तयार असल्याचे सचिन खरात यांनी सांगितले आहे. त्यासाठी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

Tags

follow us