Maratha Reservation : ‘भुजबळांनी राजीनामाच दिला पाहिजे’; विखे पाटलांचा नाराजीचा सूर

Maratha Reservation : ‘भुजबळांनी राजीनामाच दिला पाहिजे’; विखे पाटलांचा नाराजीचा सूर

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी नेतेही आले आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर आता सत्ताधारी गटातील नेतेही भुजबळांविरोधात बोलू लागले आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

Sujay Vikhe : ‘कुणाच्या नाड्या कशा आवळायच्या मला ठाऊक’ साखरपेरणीनंतर विखेंचाही ‘कडू’ डोस

मंत्री विखे पाटील यांनी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. विखे पाटील म्हणाले, सध्या समाजात ओबीसी-मराठा असा निरर्थक वाद सुरू आहे. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संयम पाळणे गरजेचे आहे. लोक त्यांच्याविषयी आदराने बोलतात. नंतर त्यांच्यावर वादग्रस्त विधानांवरून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. यासाठी त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे.

आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे भूमिका घेऊन लोकांसमोर जात असताना अशा घटनांमुळे सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या वेगळ्या भुमिकेविषयी मुख्यमंत्र्यांनीही विचार केला पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maratha Reservation : ‘भुजबळ साहेब, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’ विखे पाटलांनीही खेळलं नाराजीचं कार्ड

भुजबळ साहेब तुमच्याकडून अपेक्षा नव्हती 

याआधी यवतमाळ दौऱ्यावर असतानाही विखे पाटील यांनी भुजबळांवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. अजितदादा नेमकं काय म्हणाले हे मला माहिती नाही पण त्यांनी जर भुजबळांना समज दिली असेल तर चांगलीच गोष्ट आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका मांडली आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असं स्वतः मुख्यमंत्री सांगत आहेत. त्यामुळे विनाकारण हे जे वादळ उभं करण्याचं काम सुरू झालं आहे त्याची अपेक्षा आम्हाला भुजबळ साहेबांकडून नव्हती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube