पुणेः आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. या तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतीवर वळसे पाटील गटाची सत्ता आली आहे. एक ग्रामपंचायत शिंदे गटाकडे, तर एक ग्रामपंचायत ठाकरे गटाला मिळाली आहे. आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील नागापूर, डिंभे खुर्द, आहुपे, तळेघर, चिखली या ग्रामपंचायती बिनविरोध […]
अहमदनगरः पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येही धक्कादायक निकाल लागले आहेत. वनकुटे गावामध्ये आमदार निलेश लंके यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झालाय. लंकेंसाठी हा मोठा धक्का आहे. या ग्रामपंचायतीमध्ये अॅड. राहुल बबन झावरे हे प्रथम लोकानियुक्त सरपंच निवडून आले होते. यंदा ही जागा महिलांसाठी राखीव होती. यावेळी झावरे यांची पत्नी स्नेहल या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. त्यांचा स्थानिक विकास […]
कोल्हापूरः कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या समरजित घाटगे गटाने बाजी मारली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ गटाकडून घाटगे गटाने ग्रामपंचायती हिसकावून घेतल्या आहेत. कायम सत्ता असलेल्या मुश्रीफांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींच्या मतमोजणी सुरू आहे. त्यात कागल तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटाला […]
अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून धक्कादायक निकाल समोर आले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विखे गटाने मात दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आजी माजी महसूलमंत्र्यांच्या गटात लढत पाहायला मिळत आहे. यातच थोरातांच्या गटात […]
अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहे. निकाल पुढीलप्रमाणे श्रीगोंदा : माठ – सरपंच- अरुण विश्वनाथ पवार- ३९५ मतांनी विजयी. थिटे सांगवी- सरपंच- अर्जुन रामचंद्र शेळके- ४०२ मतांनी विजयी. चवरसांगवी- सरपंच- […]
नागपूरः महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सीमावादाचा प्रश्न चिघळत आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. फेक अकाउंटवरून ट्वीट केल्यामुळे तणाव निर्माण होत असल्याचे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीमावादात ट्वीटरच्या मालकालाही ओढले आहे. जयंत पाटील यांनी मस्क यांना केलेल्या ट्वीटची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या […]