अहमदनगर : जिल्ह्यासह मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट पाहता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात […]
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला. मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर […]
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदानं पदरात दुःखच पडल्याचं वक्तव्य केलंय. त्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर टिपण्णी केलीय. पवार म्हणाले, ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत, अशी प्रतिक्रीया दिलीय. आज रविवारी (दि.8) ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर […]
पंढरपूर : खोटे दागिने विकून किंवा खोटे दागिने विकत घेऊन फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पहिली असतील पण लोकांनी आता थेट पंढरपूरच्या विठ्ठलाची खोटे दागिने देऊन फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विठ्ठलाला थेट पोतंभर खोटे दागिने दान केल्याचं समोर आलं आहे. गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या विठठलाला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. […]
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसला धक्का दिला आहे. मंगळवारी श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांनी दिपाली सय्यद यांच्या उपस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटात प्रवेश केला. श्रीगोंदा नगरपालिकेत शिंदे गटाचा पुढील नगराध्यक्ष करण्यासाठी दिपाली सय्यद यांचे प्रयत्न आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या वर्षा बंगल्यावर पाठपुरावा करीत होत्या. यातूनचं त्यांनी काँग्रेसला […]