अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आमदार पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर आमदार पाचपुते यांचे पुतणे काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खंत व्यक्त केली. तसेच राजीनामा देण्याआगोदर ज्या जनतेनी निवडून दिले होते, त्या जनतेला देखील […]
अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत शिंदे-भाजप सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने नगर महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानपरिषदेत केली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मागवण्यात आल्याने अहमदनगर महापालिकेतील अधिकारी गोंधळून गेले […]
शिर्डी : नववर्षानिमित्त बेंगलोर येथील दानशुर साईभक्त राजा दत्ता व सौ.शिवानी दत्ता यांनी 928 ग्रॅम वजनाचा 46 लाख 70 हजार 624 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला आहे. दत्ता दाम्पत्यांनी हा सुवर्ण मुकुट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त केला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच म्हणजे 2022 मध्ये […]
कोल्हापूरः माझ्या पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. त्यामुळे शिंदे गटामध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. त्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनेकवेळी ते गंमतीने बोलतात. त्यांना किती गंभीरपणे घ्यायचे मला माहिती नाही, असे केसरकर म्हणाले. हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर […]
पुणे : भीमा कोरेगावची लढाई ही पुणे जिल्ह्यामधील भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी झाली होती. दरम्यान या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. या शौर्य दिनानिमित्त विजय […]
नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]