Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्याकडे लक्ष द्या, भाजप जिल्हाध्यक्षांचं थेट गृहमंत्र्यांना साकडं…

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्याकडे लक्ष द्या, भाजप जिल्हाध्यक्षांचं थेट गृहमंत्र्यांना साकडं…

Ahmednagar Crime : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच नुकतेच शहरातील एकविरा चौकात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खुन झाल्याची घटना घडली. सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने आरोपींना पडकले मात्र, अशा घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहे. यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील वदती गुन्हेगारी आटोक्यात यावी व अशा घटनांना आळा बसावा, यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना आपण निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे(Arun Munde) यांनी दिली आहे.

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत टाचणी पडताच चर्चेत येणारं ‘यशंवतराव चव्हाण सेंटर’ काय आहे?

नगर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. यातच आता राजकीय गॅंगवार देखील सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वी नगर शहरातील बालिकाश्रम रोडवर एका तरुणाची तलवारीने हत्या करण्यात आली होती. त्यांनतर शहरातील कुष्ठधाम रोडवर एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हे सगळं सुरु असताना नुकतेच एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर दुसऱ्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित तरुण मृत पावला आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

बीडच्या अविनाश साबळेची दिमाखदार कामगिरी; Olympic 2024 साठी पुन्हा निवड

अरुण मुंडे, घडणाऱ्या घटना या अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे असून घटनांना आळा बसावा यासाठी जिल्ह्याच्यावतीने आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवदेन देणार आहोत. आपण स्वतः नगर जिल्ह्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी देखील आम्ही करणार आहोत.

दरम्यान, शहरात खून, दरोडे, लुटमारी, चोऱ्या आदी वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सध्या नगर जिल्ह्याची प्रतिमा अत्यंत मलिन होऊ लागली आहे. यातच खुलेआम खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारीला रोख बसावा, यासाठी जिल्ह्याला दबंग व सक्षम पोलीस अधिकाऱ्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube