आमचा वाद संपलाय! राम शिंदेंसोबतच्या वादाला राधाकृष्ण विखेंनी दिला पूर्णविराम…
आमचा वाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनीच संपला असल्याचं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राम शिंदे यांच्याशी झालेल्या वादाला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले
पुढे बोलताना विखे म्हणाले, राम शिंदे आणि आमचा वाद आता संपला आहे. आमच्या दोघांमधील गैरसमज आता दूर झाले असून वाद मिटला असल्याचं राधाकृष्ण विखेंनी स्पष्ट केलं आहे.
Swiggy Delivery Boy Job : चोच दिलीय तर चाराही मिळतोच! डिलिव्हरी द्यायला गेला अन् नशीबच बदललं…
दरम्यान, भाजपचे आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधी जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी विखेंवर गंभीर आरोप केले होते.
Sharad Pawar यांना धमकी देणारा पिंपळकर गुन्हेगारच; अमरावती पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांनी विरोधात काम केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. एवढंच नाहीतर आमदार रोहित पवार आणि खासदार विखेंची छुपी युती असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
शुश्रूषागृहांनी रुग्णांची आर्थिक स्थिती लक्षात न घेता उपचार द्यावे; आरोग्य संचालनालयाचे निर्देश
शिंदे यांच्या मनात काय नाराजी आहे, हे सांगता येणार नाही. पण विखेंनी पवारांना पाठिंबा दिला, यावर जामखेडमध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यातही कोणी विश्वास ठेवणार नसल्याचा टोला खासदार सुजय विखे यांनी शिंदे यांना लगावला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-विखे वादावार भाष्य करीत दोघांमध्ये काहीही वाद नसल्याचं सांगितलं होतं. शिंदे आणि विखे यांचे पेल्यातील वाद आहेत. हे वाद असले तरी वादळ नसल्याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.