अत्रे म्हणाले असते असा हरामखोर 10 वर्षात झाला नाही; राऊतांची अजित पवारांवर जहरी टीका

अत्रे म्हणाले असते असा हरामखोर 10 वर्षात झाला नाही; राऊतांची अजित पवारांवर जहरी टीका

Sanjay Raut :  एकेकाळी सोबत कामं करणारे आता एकमेकांवर जोरदार घणाघात करताना दिसतायेत. लोकसभेचं मैदान आता अनेक नेत्यांनी गाजवलंय. एका बाजूला महायुतीचे नेते आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे. (Baramati Loksabha) आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली.

 

Sanjay Raut : राऊतांकडून मोदींना नवी उपाधी; कंस मामा म्हणत फोडलं नव्या वादाला तोंड

असा हरामखोर 10 वर्षात झाला नाही

प्र. के. अत्रे यांचं एक आवडत वाक्य होत. त्यांना काही काम आवडलं किंवा आवडल नाही तर ते म्हणायचे दहा वर्षात असं काम झालं नाही. जर आज अत्रे असते तर अजित पवारांचं काम पाहून म्हणाले असते असा हरामखोर 10 वर्षात झाला नाही अशा शब्दांत राऊतांनी अजित पवारांवर जहरी टीका केली.

 

आयत्या बिळावरील नागोबा

यावेळी राऊत म्हणाले अजित पवार सांगत आहेत बाळासाहेबांनी पक्ष काढला वाढवला आणि तोच पक्ष तुम्ही घेऊन गेलात. जर अजित पवारा हे शिवसेनेबाबत काही काळापूर्वी बोलत होते. तर यांनी दुसरं काय केलं असा प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले, तुम्ही आयत्या बिळावरील नागोबा आहेत असा टोलाही राऊत यांनी लगावला.

 

अठरा वर्षांतील विकासकामं म्हणजे टीमवर्क, अजितदादांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर

हे पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी व्यासपीठावर शरद पवार, लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे त्याचबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube