शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय! मागील कर्जमाफी न मिळालेल्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी

loan waiver for farmers राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Loan Waiver For Farmers

who did not get loan waiver in the past will get this year Big decision for farmers in cabinet meeting : राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये मागील कोणत्याही कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील यंदाच्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

603 मतांचे गणित अन् महाजनांचा ‘गॉडफादर’ रोल; गोकुळ गितेंचे बंड भाजपचीच खेळी?

यावर्षी शेतकऱ्यांसाठी सरकारने अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. मात्र या अगोदर करण्यात आलेल्या 2017 आणि 2019 ला केलेल्या कर्जमाफीमध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. तब्बल 14 हजार कोटी रूपयांची ही कर्जमाफी करण्यात येणार आहे.

सरसकट कर्जमाफी करा अन्यथा फडणवीसच्या… राहुरीत शेतकरी संतापले,शेतकरी सेनेचा रस्ता रोको

दरम्यान शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांकडून ही कर्जमाफी जाहीर झाल्यापासून 2017 आणि 2019 ला केलेल्या कर्जमाफीमध्ये पात्र असूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सरसकट कर्जमाफी करा अन्यथा…

शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावी तसेच जाचक अटी व नियम रद्द कराव्यात अन्यथा येत्या १५ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करण्यात येणार असा इशारा शेतकरी सेनेच्या वतीने देण्यात आला सरसकट कर्जमाफीसाठी राहुरी येथे शेतकऱ्यांचे वतीने रास्ता रोको करण्यात आला.

follow us