Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत जाणार? सुप्रिया सुळे 8 खासदारांसह PM मोदींना भेटणार
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा देशातील आणि राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा देशातील आणि राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जोराने सुरु आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असणाऱ्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने शरद पवार गट लवकरच भाजपासोबत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दोनदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे पक्षातील इतर जेष्ठ नेते सुद्धा भाजप नेत्यांची चर्चा करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
तर आता सोमवारी आठ खासदारांसह सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींची (PM Modi) भेट घेणार आहे. या भेटीनंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असं बोललं जातंय. तर दुसरीकडे आम्ही लपून छपून नाही तर उघडपणे भेट घेणार आहोत असं सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. राज्यातील दुष्काळ सद्दश परिस्थिती, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मात्र ही भेट डिलिमिटेशन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षण (Women Reservation Bill) विधेयकाबाबत होत असल्याचा दावा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपसोबत (BJP) जाणार का? याकडे केवळ राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; जमीन हादरली
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेवरुन त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ड्रग्ज किंवा बेकायदेशीर पैशांचा प्रवाह रोखण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे मात्र सर्वच स्वयंसेवी संस्थांकडे संशयाने पाहणे योग्य नाही. शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी लावून दुसरीकडे लाडकी बहीण योजनेद्वारे सवलती देणे हा सरकारचा केवळ निवडणुकीपुरता स्टंट आहे असं माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.