‘जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा’; झिशान सिद्धीकींना जीवे मारण्याची धमकी देत 10 कोटींची मागणी

Zeeshan Siddiqui threatened to kill him, demanding Rs 10 crore : राष्ट्रवादीचे नेते राहिलेले बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता अजित पवार यांच्या गटाचे नेते आणि आमदार झिशान सिद्धीकी यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवार 21 एप्रिल रोजी सिद्धीकी यांना एक मेल आला आहे. ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं गेलं आहे की, जी अवस्था वडिलांची केली तीच तुझीही करू. दरम्यान या धमकीनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.
मोठी बातमी ! झारखंडमध्ये आठ नक्षलवाद्यांचा खातमा ; एक कोटींचे बक्षीस असणाऱ्याला संपविले
झिशान यांना अशा प्रकारचे तीन मेल पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये दहा कोटी रुपयांची मागणी देखील करण्यात आली आहे. तर हा मेल पाठवणाऱ्याने डी कंपनीचा उल्लेख केला आहे. मात्र मेल पाठवणाऱ्याची सखोल माहिती मिळालेली नाही.
लाडकी बहीण योजना, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
त्याकरता मुंबई पोलिसांकडून झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवला जात आहे. तर माध्यमांशी बोलताना झिशान यांनी सांगितलं की, गेल्या दोन दिवसांत मला अशा प्रकारचे तीन ईमेल आले आहेत. हे मेल पाठवणारे डी कंपनीचे संबंधित असल्याचे त्यांनी म्हटलं. त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच दहा कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर मी थेट पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस घरी आले आहेत.
कुंभमेळा 2027 साठी CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; आता नाशिकलाही बाह्यवळण
तर गेल्या वर्षी झिशान यांचे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची देखील हत्या करण्यात आली होती. 12 ऑक्टोबर 2024 च्या रात्री मुंबईतील वांद्रा येथील झिशान यांच्या ऑफिसमधून ते बाहेर पडत होते. त्यावेळी तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला करत गोळीबार करून त्यांना जिवे मारलं होतं. त्यानंतर या हत्याकांडाशी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंग यांचे नाव समोर आलं होतं. तेव्हापासूनच सिद्दिकी यांच्या परिवाराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.