पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, ठाकरेंच्या शिलेदारानं ठासून सांगितलं

पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, ठाकरेंच्या शिलेदारानं ठासून सांगितलं

Ambadas Danve : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आज वाढदिवस आहे. यानित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक नेत्यांनी त्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दानवेंनी पुढच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असं सूचक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

Malavika Mohanan : लाल रंगाची साडी नेसून मालविका मोहननने वातावरण तापवलं… 

अंबादास दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत. यावेळेस महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन होणार आहे. पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असा आम्हाला विश्वास आहे. केवळ शिवसैनिकांच्या शुभेच्छाच नव्हे तर राज्यातील सामान्य जनतेच्या शुभेच्छा उद्धव ठाकरेंसोबत आहेत. पुढच्या काळात उद्धव ठाकरेचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतील, असं दानवे म्हणाले.

राणेंची वायफळ आणि खालच्या दर्जाची भाषा…
भाजप नेते नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर वाढदिवसाच्या दिवशी गंभीर आरोप केले. त्याविषयी विचारलं असता दानवे म्हणाले की, नितेश राणेंच्या टीकेकडे फार लक्ष देऊ नये. ते वायफळ आणि खालच्या दर्जाची भाषा वापरतात. नितेश राणेंकडून आम्ही काय बोलावं, याची अपेक्षा करत नाही. पण अमित शहांकडून देखील अशी भाषा अपेक्षित नाही. ज्या पद्धतीने ते राजकीय स्तर सोडत आहेत, तसा आम्ही सोडणार नाही, असं दानवे म्हणाले.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नाही…
आज दिल्लीत NITI आयोगाची बैठक होत आहे. मात्र इंडिया अलायन्सने या बैठकीवर बहिष्कार टाकला. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, आपण केंद्रीय अर्थसंकल्प पाहिला. यात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले तेही पाहिले. महाराष्ट्राच्या वाट्याला सातत्याने अपमान आला आहे. महाराष्ट्रावर 7 लाख 88 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, असं असतांना नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नाही. राज्यात भाजपची सत्ता असूनही नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नसल्याचे स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, अलीकडचे दानवेंनी पुढच्या वर्षी पांडुरंगाची पूजा उद्धव ठाकरे करतील, असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दानवेंनी पुढच्या वाढदिवसाल उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्री असतील, असं वक्तव्य केल्याने ठाकरे महाविकास आघाडीची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube