‘ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचं रक्त’; आशिष शेलारांची जळजळीत टीका
Aashish Shelar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलं असल्याची जळजळीत टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यक्रमासंदर्भात आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आयारामांना चाप अन् नव्या चेहऱ्यांचा शोध; भाजपने विनोद तावडेंवर सोपविली मोठी जबाबदारी
आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले, अयोध्येतील राम मंदिरासाठी कोठारी बंधूंनी गोळ्या झेलल्या आहेत. मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने त्यांचा खून केलायं,. आज समाजवादी पक्षासोबत उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केल्याने त्यांच्या हाताला रामभक्तांच्या कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागल्याचं आशिष शेला म्हणाले आहेत.
Steve Waugh : ..तर मी क्रिकेटच खेळलो नसतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘त्या’ निर्णयावर स्टीव्ह वॉ भडकला
ठाकरे कुटुंबाचा मान अन् स्वाभिमान भाजपचे टिकवला पण..,
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुनही आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या, बंगल्यावर या, अश्या पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चालले आहेत, अशी टीका आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता. स्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी खुर्चीसाठी लोलुपता केवढी होती हे उद्धव ठाकरे यांनी आज दाखवले असल्याची टीका शेलार यांनी केली.
आव्हाडांनी पुण्यात येऊन अजितदादांना शिंगावर घेतले; आतापर्यंत त्यांची केवळ दादागिरीच !
दरम्यान, भाजपकडून तीन लोकसभांसाठी एक नेता या प्रमाणे देशभर प्रवासाचा कार्यक्रम ठरवण्यात आला असून या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही राजकीय मंडळी देशातील तीन ते चार लोकसभेचे एक क्लस्टर बनवून बैठका घेणार असल्याचंही आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून येणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.