ते मोठेचं होतील! तावडेंच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चंद्रकांतदादांची कोल्हापुरातून साखरपेरणी
कोल्हापूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. याशिवाय त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे लवकर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असून, यासाठी विनोद तावडेंसह (Vinod Tawade) अनेक नावे चर्चेत आहेत. आता अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) तावडेंच्या अध्यक्षपदासाठी आतापासूनच साखरपेरणी करत फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. (Chandrakant Patil On BJP National President Name )
विषय सोपा : कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये नेमका काय फरक?
तावडेंची भूमिका मोठी
पुढे बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजप चालवण्यासाठी तावडे यांची मोठी भूमिका आहे. तावडे हे कर्तृत्वान नेतृत्व असून जिथे पाठवू तिथे यश कसं मिळेल यासाठी बारकाईने विचार करतात अशी कौतुकाची थापही पाटलांनी लगावली. विनोद तावडेंसाठी खूप ऑप्शन चर्चेमध्ये असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तावडे मोठे झाल्यास मला आनंद होईल असे विधान चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
विनोद तावडे हे पक्षाच्या सरचिटणीस पदापासून काम करत आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी आजपर्यंत दिली ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षात आता मोठी संधी दिली जाऊ शकते असे ते म्हणाले. तावेड महाराष्ट्रात 1995 ला सरचिटनीस झाले. त्यानंतर लगेच चार वर्षात मुंबईचे अध्यक्ष झाले. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटनीस असून, त्यांची भाजप वाढवण्यात मोठी भूमिका आहे. त्यामुळे त्यांना काय पद द्यायचे हे केंद्र ठरवेल. परंतु, ते काहीही झाले तरी ते मोठेचं होतील आणि त्यावेळी मला खूप आनंद होईल असे पाटील म्हणाले.
27 ओबीसी, 15 एसटी अन्… कसं आहे मोदींचं मंत्रिमंडळ? एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण समीकरण
मोहन भागवत हे आमचे सर्वांचे पालक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतेच मणिपूरच्या शांततेवर भाष्य केले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मोहन भागवत काय बोलले हे मी पाहतो. पण ते काही बोलले असतील तर त्यांना त्याचा अधिकार असून, ते आमचे सर्वांचे पालक आहेत. यावेळी त्यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 2019 ला उद्धव ठाकरे युतीसोबत होते त्यावेळेस त्यांना 18 जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर सर्वाधिक कष्ट त्यांनी घेतले. पण आता ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांना काय मिळालं. अल्पसंख्यांकाच्या नावावर मतं मिळाली असा ठपका त्यांच्यावर बसला. त्यामुळे 2019 ला सोबत राहिले असते तर आता जी वाताहत झाली ती झाली नसती.
राधाकृष्ण विखे मुख्यमंत्री; शरद पवारांनी टाकला होता शब्द, अंकुशराव काकडेंचा मोठा खुलासा
फडणवीस राजीनामा देणार?
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या. यात भाजपला 9, शिंदे गटाला 7 तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकच जागा जिंकता आली. या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती वरिष्ठ नेत्यांना केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अपयश मिळालं की, मानसिकता बदलते मात्र सहकाऱ्यांनी समजावून सांगितले की ते उभे राहतात. अमित शहा यांनी थांबा म्हटल्यानंतर ते थांबले आहेत आणि ते पुन्हा कामाला लागले आहेत.