बोगस खत-बियाणांवर आळा घालण्यासाठी धनंजय मुंडे आक्रमक, ‘तक्रार करण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरु करा’
Dhananjay Munde : खत विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खतांची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत.
कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.
शेतकऱ्यांनी व्हट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ ठिकाणी तपासणी करण्याच्या सुचना मुंडे यांनी यावेळी दिल्या.
कापूस बियाण्यांच्या बाबतीत आढावा घेताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाचे अनधिकृत बियाणे विक्री होतात. यासाठी महाराष्ट्रात असलेला महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा २००९ व नियम २०१० अंतर्गत शेतकरी तक्रारी करतात. हजारो दावे आज उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. कंपन्यांवर कारवाई होत नाही आणि तक्रार करणारा शेतकरी यात भरडला जातो.
Opposition Meeting : बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांचे खलबतं; डिनर मिटींगचे फोटो आले समोर, पाहा…
त्यामुळे ह्या कायद्यात आमुलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळण्यासाठी कडक कायद्याची गरज असून त्याचे प्रारुप तयार करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिलेत.
दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचं आज वस्त्रहरण, सोमय्यांना नाना पटोलेंनीही नाही सोडलं…
कापसाच्या एचटीबीटी या वाणाला केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने परवानगी दिली नाही. तरीही महाराष्ट्रात या बियाण्याची विक्री होत आहे. बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी असेही मुंडे यांनी सांगितले. तसेच बियाण्यांच्या तक्रारीबाबत ओरिसाच्या धर्तीवर सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार करण्यात यावे अशी सूचना केली.