Deepak Kesarkar : परबांचं वक्तव्य खोटं, सहन करणारच नाही, अध्यक्षांना देणार पत्र; केसरकरांचा कडक इशारा
Deepak Kesarkar : ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar vs Anil Parab) यांच्यातील वाद आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याला निमित्त ठरलं आहे दीपक केसरकर यांची उलटतापसणी. आमदार अपत्रातता सुनावणीच्या (MLA Disqualification) उलटतपासणीत केसरकरांनी बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते. मनमानी कारभार होता, असं म्हटलं होतंं असा गौप्यस्फोट परब यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देत विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचाा इशारा मंत्री केसरकर यांनी दिला. केसरकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संंवाद साधत परब यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांना इतक्यात सोडणार नसल्याचेही स्पष्ट केले.
Anil Parab : केसरकरांनी बाळासाहेबांनाच खोटं ठरवलं; अनिल परबांचा घणाघात
केसरकर म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली सुनावणी हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामध्ये जे काही घडतं त्या सगळ्यांची नोंद घेतली जाते. ते रेकॉर्डेड असतानाही त्याबद्दल खोटी बातमी कुणीही देऊ शकत नाही. तरी देखील अनिल परब यांनी खोटं वक्तव्य केलं. मी जे काही बोललोच नाही ते शब्द माझ्या तोंडी घालण्यात आले. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे. या संदर्भात मी विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. जर त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टातही जाण्याची माझी तयारी आहे. अशा प्रवृत्तींना कुठेतरी थांबण्याची गरज आहे.
एकतर आपण नियम पाळायचे नाहीत दुसऱ्यांची विनाकारण बदनामी करायची हे कधीही चालणार नाही. ज्या बाळासाहेबांबद्दल मला नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोललो हे त्यांचं म्हणणं मी कधीच खपवून घेणार नाही. कारण, बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहावं म्हणून मी मोठा त्याग केलेला आहे. त्यामुळे मी हे सहन करणार नाही आजच अध्यक्षांना पत्र देणार आहे.
Deepak Kesarkar : ..तर मी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देईन; केसरकरांनी कुणाला दिलं चॅलेंज ?
काय म्हणाले होते अनिल परब ?
आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उलट तपासणी सुरू आहे. ज्या शिवसेनेत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानले जात नाहीत म्हणत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटाचे ते नेते आहेत. केसरकर 2014 साली शिवसेनेत आले. ज्यावेळी केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार झाले त्यावेळी ते बाळासाहेबांच्या विचाराविरोधात लढत होते. अशी माणसं बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्हाला शिवसेना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आज तर हद्दच झाली. केसरकरांनी त्यांच्या उलट तपासणीत केसरकरांनी बाळासाहेबांनी कधीही निवडणूक प्रक्रिया राबवली नाही. एका पद्धतीने त्यांनी मनमानी केली. लोकशाहीचा आदर केला नाही अशा प्रकारचे संकेत त्यांनी उलट तपासणीत दिले.