पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी

पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी

Weather Update : सध्या राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. (Rain) काल राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

48 तासांत जोरदार पाऊस भीषण अपघात! खरेदीसाठी गेलेल्या जवानांवर काळाचा घाला; दोंघाचा मृत्यू, सहाजण गंभीर जखमी

हवामान विभागाने राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे आणि मुंबईसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही विजाच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात पुढील 48 तासांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात मोठा पाऊस

कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तर, खान्देश आणि पूर्व विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, काल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. धाराशिव, तुळजापूर आणि उमरगामध्ये पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

 उन्हाचा चटका आणि उकाडा ..त्यानंतर मोदी-शहा नितीश-नायडूंचे पक्ष फोडतील; राऊतांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रात आल्यानंतर नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती हवामान खात्याने रविवारी दिली. सध्या राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भात कमाल तापमान पुन्हा चाळीशीपार गेले आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील चंद्रपूर येथे ४१.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. बम्हपुरी आणि वर्धा येथे पारा ४० अंशांपार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज