इक्बाल चहल यांची ईडीकडून कसून चौकशी, चौकशीत हे आले समोर?

इक्बाल चहल यांची ईडीकडून कसून चौकशी, चौकशीत हे आले समोर?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावर असताना इक्बाल चहल यांना कथित जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आला. आज त्यांना हजर राहण्याचं ईडीकडून सांगण्यात आलं होतं.

त्यानुसार आज चहल ईडीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता हजर झाले असून त्यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ईडीने त्यांच्याकडून जम्बो कोविड सेंटरच्या कराराच्या कागदोपत्रांची माहिती मागितल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीय.

या प्रकरणी माझा काहीही संबंध नसून माझ्याकडून हवे असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणार असल्याचं इक्बाल चहल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यानंतर आज ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले.

इक्बाल चहल कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावर असताना महापालिकेकडून 100 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात होता.

त्यानुसार भाजप नेत्यांच्या मागणीनंतर अखेर चहल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मी पळणार नाही, ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार असल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, अखेर ईडीकडून इक्बाल चहल यांची आज कसून चौकशी केलीय. मात्र, या चौकशीत ईडीला कोणती माहिती अथवा काय निष्पन्न झालंय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube