जितेंद्र आव्हाड यांना घरीच मारण्याचा प्रयत्न? बाॅम्ब ठेवल्याचा फोन अन् पोलिसांची तारांबळ
Jitendra Awhad : राष्ट्रवादी (अजित पवार) जितेंद्र आव्हाड यांच्या (Jitendra Awhad) घरी बॅाम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तात्काळ बॅाम्ब शोधक आणि नाशक पथकामार्फत सर्च ॲापरेशन (Search Operation) राबविले. मात्र काहीही आढळून आले नाही. दरम्यान, पोलिसांनी निनावी फोन बाबत मुंबई पोलीस कसून तपास करत आहेत. कोणी खोडसाळपणा केली की हा इशारा होता याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची धमकी मिळाली होती. या संदर्भात त्यांनी एक ट्वीट देखील केलं होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात बॉम्ब असल्याच्या एका निनावी फोन काल रात्री प्राप्त झाला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर बॉम्बशोधक विभागाने तपासणी केली, पण काहीही आढळून आले नाही. मात्र त्यानंतर बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. बॉम्ब शोधक पथके देखील तैनात करण्यात आली होती.
सहा तासांचे ऑपरेशन, सहा गोळ्या बाहेर काढल्या… : महेश गायकवाडांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती
काही दिवसांपासून सतत मुंबई पोलिसांना (Mumbai Police ) धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. (Mumbai Bomb Threat) या मेसेजमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला होता.