जिथे राहत नाही तिथे, जाऊन येणे म्हणजे…; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोला

  • Written By: Published:
जिथे राहत नाही तिथे, जाऊन येणे म्हणजे…; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोला

Kunal Kamra On Mumbai Police : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक विडंबन गाणे रचले होते. त्यावरून कुणाल कामराविरुद्ध मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन गुन्हे नोंदविले होते. याप्रकरण खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजाविले आहे. त्यामुळे कामराने पोलिस स्टेशनला हजर राहणे आवश्यक आहे. परंतु तो हजर राहिलेला नाही. तो दुसऱ्या राज्यात असल्याचे बोलले जात आहे. तो पोलिस स्टेशनला हजर राहिला नाही. त्यामुळे खार पोलिस स्टेशनचे अधिकारी हे कुणाल कामराच्या घरी गेले होते. परंतु तो घरी नव्हता. त्यावर आता कुणाल कामराने एक्स पोस्ट करत मुंबई पोलिसांचे नाव न घेता एक टोला लगावला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून मी जिथे राहत नाही, तेथील पत्त्यावर जाऊन येणे म्हणजे तुमचा वेळ व सार्वजनिक यंत्रणेचा अपव्यय करणे होय, असे कामरा याने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.


गेल्या १० वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे. कुणाल कामरा याला खार पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन समन्स बजाविले आहे. तरीही तो चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. कामराच्या माहिमच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांचे एक पथक येऊन गेले आहे. त्याच्या घरच्यांनी तो घरी नसल्याचे समजल्यानंतर पोलिस हे निघून आलेत. परंतु त्याच्या घरी काही पोलिस तैनात करण्यात आले आहे. आता पोलिसही कामराला तिसरे समन्स बजावू शकते. पोलिस आपली कायदेशीर कारवाई करत आहे. त्यामुळे कामराला मुंबई पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे. परंतु कुणाल कामराने एक्सवर पोस्ट करून मुंबई पोलिसांना टोला लगावला आहे.

चित्रपट गीत, लोकसंगीत, रॉक साँग, नृत्य…हजारो रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘रसिकोत्सव’ रंगला

कुणाल कामगाराविरुद्ध शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराने गाणे म्हटलेले स्टुडिओची तोडफोड केली आहे. तू मुंबईत येऊन दाखव, तुला शिवसेना स्टाईने धडा शिकविला जाईल, असा इशारा शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. तर शिंदे गटाच्या राहुल कणाल यांनी आक्रमक भूमिका घेतलीय ते म्हणाले, मी दर सोमवारी आणि गुरूवारी मी हजेरी लावतोय. आज खार पोलीस ठाण्यात आलो होतो. कायद्याचे पालन करतो म्हणता मग कायद्यापासून लांब का पळता. कुणाल कामरा यांचे स्वागत शिवसेना स्टाईलने करू , काय करू हे तुम्ही बघाल तो मुंबईत आल्यावर त्याला उत्तर मिळेल, असे राहुल कनालने म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube