भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेच्या खासदारांचे तिकीट कट केले, त्यामुळे माजी मंत्री सुरेश नवलेंनी राजीनामा दिला.
आपले विचार कायम ठेऊन भाजपसोबत जाऊ असा प्रस्ताव शरद पवारांसमोर ठेवला. पण त्यांनी भूमिका बदलल्या असं अजित पवार म्हणाले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळांच्या माघारीनंतरही राष्ट्रवादीचा या जागेवर दावा कायम आहे. आता नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय.
'चंद्र, सुर्य आहेत, तोवर संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा सुनंदा पवार यांनी केला आहे.
निवडणुकीनंतर शरद पवारांना भिंग लावून शोधावं लागणार असल्याचा शाब्दितक टोला भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी लगावला आहे.