हिंगोलीत बॅलेट मशीन बदलल्या; अमरावती, नांदेडात ‘ईव्हीएम’ बिघडले
Lok Sabha Election 2024 Update : देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, केरळ यांसह 13 राज्यांतील 88 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 1200 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणांवरून मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या बातम्या येत आहेत. नांदेड आणि अमरावतीत काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत. तर हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा येत आहे. राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत फक्त 7.45 टक्के मतदान झाले आहे. कडाक्याचा उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस कमी मतदान होते असा अनुभव आहे. परंतु, राज्यात तर सकाळच्या टप्प्यातच कमी मतदान झाल्याचे दिसत आहे.
Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…
या प्रकारानंतर हिंगोलीत 39 बॅलेट मशीन आणि 16 कंट्रोल युनिट बदलल्याची माहिती देण्यात आली. तसेच 25 ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनही बदलल्या. त्यामुळे मतदान काही काळ थांबले होते. हिंगोलीत सकाळी 9 वाजेपर्यंत 7.23 मतदान झाले. या व्यतिरिक्त अमरावती, नागपूर, नांदेड या जिल्ह्यांतूनही मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.
अमरावतीमधील वडपुरा भागातील महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे येथील मतदान काही काळ थांबले होते. यानंतर नांदेड येथील मतदान केंद्र क्रमांक 5 मधील मशीन बंद पडले होते. वर्ध्यातील कारंजामधील एका मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली. या काही घटनांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी मतदान व्यवस्थित सुरू आहे.
मतदान यंत्रात बिघाड किंवा अन्य काही अडचणी उद्भवल्या तर निवडणूक कर्मचारी तत्काळ या अडचणी सोडवतात. त्यामुळे काही वेळातच पुन्हा मतदान सुरू होते. यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली असते. त्यामुळे अडचणी आल्या तरी त्या तत्काळ सोडविल्याही जातात.
Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं..