Ahmednagar News : शासनाने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) हा उपक्रम राज्यभर राबवला. या उपक्रमावर शासनाकडून मोठा खर्च देखील करण्यात आला होता. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळण करत असते. मात्र इथं विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही तासात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगचच्या घाटी रुग्णालयातही एका रात्रीत 10 रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनानंतर संपूर्ण शासन आणि प्रशासनाविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अशाच प्रकारची घटना […]
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपली प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्य नागरिक थेट मंत्रालयातील संबंधित खात्याचे प्रमुख किंवा मंत्रिमहोदयांना भेटून व्यथा मांडत असतात. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आहे. व्यथा मांडण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मंत्रालयापासून ते थेट मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लांबच-लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अहमदनगर (Ahmednagar) शहरात येत्या शनिवारी (ता.७) सभा होत आहे. त्या सभेचे नियोजन करण्यासाठी आज सकाळी शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मराठा समाजाला आरक्षण मिळाने, यासाठी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी […]
Nanded Death : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यूच्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. या घटनेवरुन सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असतानाच खासदार हेमंत पाटलांनीही(Hemant Patil) रुग्णालयाची पाहणी करताच चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे. रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पाहताच हेमंत पाटलांनी(Hemant Patil) रुग्णालयाच्या डीन(अधिष्ठाता) यांच्याकडून रुग्णालयाच्या शौचालयाची सफाई करुन घेतली आहे. यावेळी पाटील यांनी […]
Nanded Hospital Death : ठाण्यातील (Thane Hospital Death) कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये (Nanded Hospital Death) ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Hospital Death) मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. […]