मुंबई : प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी दिलीय. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीसंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे. अद्याप […]
औरंगाबाद : मागच्या सरकारमध्ये निर्णयच होत नव्हते पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून उद्योगासाठी आम्ही चांगले निर्णय घ्यायला सुरु केलं आहे. असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केले आहे. ते आज औरंगाबाद मध्ये ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ च्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. पायाभूत सुविधा निर्माण करणे, कर्ज उपलब्ध करून देणे, परवानगी आणि परवाने याची प्रक्रिया […]
मुंबई : महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचं अमेरिकेत निधन झालं. अमेरिकेत राहुन त्यांनी मराठी संस्कृती फुलवण्यात मोठं योगदान दिलं. सत्तरच्या दशकात अमेरिकेत जाणाऱ्या तरूणांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात. सांगलीतून मुंबईत आणि नंतर ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गेले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी झालेली हानी आहे. 1970 च्या दरम्यान जे […]
औरंगाबाद : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. लग्नामध्ये जेवण केल्यानंतर अनेक लोकांची प्रकृती बिघडली. सुदैवानं वेळीच उपचार मिळाल्यानं सर्वजण बचावले आहेत. विषबाधा झालेल्या सर्वांवर औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा […]
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. हे मंदिर पुढील आठ दिवस बंद असणार आहे. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलीय. येथील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. […]
मुंबई : राज्यात थंडीचा जोर कायम असतानाच दुसरीकडं काही भागात पावसानं हजेरी लावलीय. सध्या वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसताहेत. त्यामुळं कधी थंडी तर कधी पाऊस असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा मात्र चांगलाच धास्तावलाय. या पावसामुळं हातातोंडाशी आलेलं पीक वाया […]