Thackeray Vs Shinde : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या सत्ता संघर्षावरील सुनावणी आज संपेल अशी शक्यता असताना आजची सुनावणी संपल्यानंतर कोर्टाने सुनावणीसाठी नवीन तारीख दिली आहे. सुप्रीम कोर्टाला पुढील आठवड्यात होळीच्या सुट्टी असल्यामुळे सत्ता संघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरूच राहणार आहे. पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे. सुप्रीम कोर्टात दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या म्हणजे शेवटच्या […]
अहमदनगर : दहा वर्षांपूर्वी घडलेल्या नेवासे तालुका दूध संघाच्या वीजचोरी प्रकरणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत गडाख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यामध्ये 2012 ते 2015 सालच्या संचालक समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. 'आत्तापर्यंत 21 जिल्ह्यांचा दौरा'#RupaliChakankar https://t.co/Z06PmEDVZt […]
बीड : महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत आम्ही 21 जिल्ह्यांचा दौरा केला असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलीय. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. रुपाली चाकणकर काल बीडमध्ये होत्या. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा […]
यवतमाळ : अधिवेशनाच्या गदारोळानंतर ठाकरे गटा-शिंदे गटाच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचं सत्र अद्यापही सुरुच आहे. आमच्या एका शिवसैनिकांकडूनही माजी मंत्री संजय राठोड यांनी पैसे घेऊन काम केलं असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यवतमाळमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ….तर शिंदे-फडणवीस सरकारची अडचण होणार, ज्योतिषाचार्य सिध्देश्वर मारटकर ते […]
Pune Bypoll Results : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. कसब्यात काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी निवडून आले आहेत. दरम्यान चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या अजूनही आघाडीवर आहेत. शेवटच्या काही फेऱ्या मोजण्याचे शिल्लक आहे. पुढील काही वेळात तेथील निकाल स्पष्ट […]
मुंबई : राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे समर्थक आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना विधिमंडळ नव्हे चोरमंडळ असा शब्द वापरला होता. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली. राऊत यांनी सभागृहाचा आणि सभागृहातील सदस्यांचा […]