टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
पाण्यात करंट पसरल्याने पाण्यीतील सुमारे २४ म्हशी जागीच मृत्यू पावल्या. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
नगर तालुक्यातील पांगरमल येथे शेळी चोरीच्या संशयातून चौघांना मारहाण झाली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
आमदार रवींद्र धंगेकर आणि आमदार अनिल देशमुखांनी ससून रुग्णालयाच्या कारभारावरून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली
लाच लुचपत विभागाकडून कारवाई झाल्यानंतर फरार मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी आज न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलायं. मात्र, सरकारने म्हणणं सादर केलं नसल्याने त्यांचा जामीन लांबणीवर गेला आहे.