NCP Foundation Day : बारामतीची सहानभुती, सर्दी-पडसं अन् धनुभाऊंची पायाची शपथ; काय घडलं?
मुंबई : सर्दी-पडसं झालं तरी थांबणार नाही असा शब्द राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) पायाची शपथ घेत दिला आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला जोपर्यंत विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा शब्द धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला आहे. ते राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. (Dhananjay Munde Speech In NCP 25th Foundation Day Function)
अजितदादांसाठी तटकरे पवारांना भिडले; भर कार्यक्रमात विचारला थेट प्रश्न
असं का म्हणाले धनुभाऊ?
राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना तटकरे म्हणाले की, धनंजय, आता तुझ्या सर्दी पडशाचं निमित्त चालणार नाही असे विधान केले. त्यानंतर धनंजय मुंडेंनी थेट अजित पवारांच्या पायाची शपथ घेत त्यांना महाराष्ट्र पालथा घालण्याचं आश्वासन दिलं. तसेच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला जोपर्यंत विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा शब्द दिला.
तुम्हाला लवकर पचणी पडणारं नाही; आखाड्यात उतरतं मोहोळांचं सुळेंना जिव्हारी लागणारं प्रत्युत्तर
याआधी 2014 ते 2019 या काळात चार वेळा महाराष्ट्र पालथा घातला, आता माझ्या सर्दी पडशाची आठवण तुम्हाला आली. आज आपल्याला कदाचित माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली असेल, पण 2014-2019 या काळात मला ना सर्दी होती ना पडसं होतं असे मुंडे म्हणाले. या निवडणुकीत काहीही झाल तरी येणारी वेळ ही घड्याळाचीच असेल. गेल्या 25 वर्षांत लोकांची सेवा करण्यात सिंहांचा वाटा हा दादांचा आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
पुण्यात भाजपची ताकद वाढली! मोहोळांना मंत्रिपद मिळणं अजितदादांसाठी धोक्याची घंटा!
तरी तिकडे मी रुमाल घेऊन जाईल…
विधासभेलाच नव्हे तर तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका असो वा नगरपरिषद, जोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या सर्दी-पडशाचा तुम्हाला त्रास होणार नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या नाकाला जरी धार लागली तरी तिकडे मी रुमाल घेऊन जाईन. बारामतीची जागा हरलो तरी याचं फार दुःख करु नका. कारण विकास आणि सहानुभुतीचा तराजू जर केला तर, सहानुभूतीच दाखवेल. त्यामुळे याच शल्य पूर्णपणे विधानसभेला भरुन काढू असे धनंजय मुंडे म्हणाले.