संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीचं रणशिंग! 14 जानेवारीपासून राज्यभर मेळावे घेणार…

संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीचं रणशिंग! 14 जानेवारीपासून राज्यभर मेळावे घेणार…

Mahayuti Alliance : देशात लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महायुती (Mahayuti Alliance) आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये आज मुंबईत महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. यासाठी महायुतीकडून 14 जानेवारीपासून राज्यभर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘महानंदा’ गुजरातला गेल्यास शिवसेना गप्प बसणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा

यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी निवडणुकीचा प्लॅन सांगितला. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली. बावनकुळेंनी सांगितलं की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही महायुती म्हणून ताकतीने लढू आणि राज्यात 45 हून अधिक जागा जिंकू असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील मराठा समाज बारा बलुतेदारांनी ओबीसी समाज आमच्या पाठीशी असल्याचाही त्यांनी सांगितलं.

Chhagan Bhujbal : ‘होय, ओबीसींसाठी 35 वर्षांपासून मला वेड’; भुजबळांनी जरांगेंना ठासून सांगितलं

तर राष्ट्रवादी कडून सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यापासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहेत 14 जानेवारीला हे मिळावे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेतले जातील. अशी माहिती तटकरे यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाकडून अदानींना मोठा दिलासा, हिंडनबर्ग प्रकरण SIT कडे सोपवण्यास स्पष्ट नकार

तसेच या परिषदेमध्ये बावनकुळे आणि तटकरे यांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केली. यावेळी बावनकुळे यांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसचे आत्मा जर हिंदुत्वाचा असेल तर ते वारंवार सावरकरांचा अपमान का करतात? तसेच संजय राऊत यांनी कपिल सिब्बल यांचे सुप्रीम कोर्टातील अॅफेडेव्हिट वाचावे मग टिप्पणी करावी. बाकी संजय राव त्यांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी नितेश राणे आहेत.

तसेच अदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात जात असल्याच्या आरोपांवर बावनकुळे यांनी म्हटलं की, दिवसभर मीडियामध्ये येण्यासाठी त्यांच्याकडून अशा प्रकारचे फेक नॅरेटिव्ह तयार केले जातात. तसेच तटकरे यांनी देखील यावेळी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, मोठ्या पराजयाच्या भीतीने त्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube