‘पंतप्रधान, मुख्यमंत्री…मला न्याय द्या’; प्रिया सिंगचा पोलिसांवरही गंभीर आरोप

‘पंतप्रधान, मुख्यमंत्री…मला न्याय द्या’; प्रिया सिंगचा पोलिसांवरही गंभीर आरोप

MSRDC : एमएसआरडीसीचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने प्रेयसी प्रिया सिंग (Priya Singh) हिच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडालीयं. या प्रकरणा आता नवी अपडेट समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी जबरदस्तीने सही करण्यास सांगितल्याचा आरोप प्रिया सिंगने केला आहे.

प्रिया सिंग म्हणाली, काल रात्री काही पोलिस आले होते. पोलिसांनी जबरदस्तीने काहीतरी सही करण्याचा प्रयत्न करत होते. मी नकार दिला कारण तिच्याकडे वकील नव्हते आणि माझ्या कुटुंबातील कोणीही नव्हते. ते मला बळजबरी करत होते, मला सांगत होते की आता सही करा आणि उद्या काय होते ते पहा, असं प्रिया सिंगने स्पष्ट केलं आहे.

सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन : लोकसभेपूर्वी PM मोदींचे गुजरातला सर्वात मोठे गिफ्ट

पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना विनंती :
प्रिया सिंग यांनी सही केली नाही त्यामुळे पोलिस रागावले आणि निघून गेले. त्यानंतर प्रियाने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

अश्वजीत आणि जखमी तरुणीचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अश्वजीत हा विवाहित आहे. त्याने ही बाब तरुणीपासून लपवून ठेवले होते. तरुणीला हे कळल्यावर तिने त्याला जाब विचारला होता. त्यामुळे अश्वजीत याने तरुणीचा फोन घेणेही बंद केले होते. एक फोन झाल्यानंतर अश्वजीतने तिला घोडबंदर भागातील कोर्टयार्ड हॉटेलजवळ भेटण्यासाठी बोलविले होते.

शरद पवारांची भीती वाटत असल्यानेच त्यांच्यावर टीका; फडणवीसांना जयंत पाटलांनी सुनावले !

दोघे भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाले. त्यातून चिडलेल्या अश्वजीतने आपल्या चालकाला तरुणीच्या अंगावर रेंज रोव्हर गाडी घालण्यास सांगितले. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. जखमी तरुणीला नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात जाऊन पोलिसांनी जखमी तरुणीकडे चौकशी केली आहे. दरम्यान अश्वजीतचे काही मित्र हे रुग्णालयात येऊन धमकी देत असल्याचे आरोपही जखमी तरुणीकडून केले जात आहे. या तरुणीने सोशल मीडियावरूनही काही आरोप केले आहेत.

दरम्यान, या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे, असे ट्वीट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube