मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; दोन जणांची प्रकृती चिंताजनक

मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; दोन जणांची प्रकृती चिंताजनक

Mumbai News : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या (Mumbai News) फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेतील जखमी प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळीच प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकांत प्रचंड गर्दी होत आहे. आजही उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात जमले होते. गर्दी इतकी होती की पोलिसांनाही नियंत्रित करता आली नाही.

बांद्रा गोरखपूर एक्सप्रेस रेल्वे फलाटावर येताच रेल्वेत प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. प्रवासी एकमेकांना धक्काबुक्की करू लागले. याच दरम्यान पळापळ सुरू झाली. त्यामुळे बरेच जण चेंगराचेंगरीत सापडले गेले. भाभा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. रितेश यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एकूण ९ प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

मोठी दुर्घटना! श्रावण सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी

या घटनेवर बृहन्मुंबई महापालिकेने प्रतिक्रया दिली आहे. दिवाळी सणासाठी मुंबईतून लोक त्यांच्या गावी निघाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली आहे. त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी झालेले प्रवासी फरशीवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

व्हिडिओत एक रेल्वे पोलीस कर्मचारी जखमी प्रवाशाला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जाताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओत काही लोक फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसत आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये शब्बीर अब्दुल रहमान, परमेश्वर सुखदार गुप्ता, रवींद्र हरिहर चुमा, रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती, संजय तिलकराम कांगाय, दिव्यांशू योगेंद्र यादव, इंद्रजित साहनी, नूर शेख यांचा समावेश आहेत. यातील नूर शेख आणि इंद्रजित साहनी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

दाना वादळाचा इफेक्ट! तब्बल ७५० रेल्वे अन् ४०० उड्डाणे रद्द; ६ लाखांहून अधिक विस्थापित

मुंबई महापालिकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ५.५६ वाजता वांद्रे टर्मिन्सच्या फलाट क्रमांक १ वर चेंगराचेंगरी झाली. वांद्रे टर्मिनसवरील १ प्लॅटफॉर्म क्रमांवर २२९२१ वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस ही लागलेली होती. ट्रेनमध्ये चढताना झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली ज्यात ९ प्रवासी जखमी झाली त्यात २ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमी प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संजय राऊतांचा सरकावर हल्लाबोल

रेल्वे सेवेच्या सुधारण्याबाबत चर्चेला कुणी तयार नाही. देशाच्या रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत आहेत. मोदींचे तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर देशात २५ पेक्षा जास्त रेल्वेचे अपघात झाले असून शेकडो लोक मृत्यू पावले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेबाबत सुधारणा करायला पाहिजे होत्या मात्र कुणी करायला तयार नाही. दुर्घटनेत प्रवासी जखमी याला रेल्वेमंत्री जबाबदार नाही काय असा सवाल उपस्थित करत रेल्वेच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube