अबब! एकट्या मुंबई महापालिकेत 52 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) विविध विभागांतील हजार दीड हजार नव्हे तर तब्बल 52 हजार 221 पदे रिक्त असल्याचं माहिती अधिकारातून पुढे आलं. मुंबई महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी 1 लाख 45 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना महापालिकेचा कारभार केवळ एक लाख कर्मचाऱ्यांच्या जीवावर सुरू आहे. त्यामुळे उर्वरित रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी होत आहे.
Manoj Jarange Patil : मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही…
महापालिकेत 129 विविध विभाग असून यातील काही विभाग अत्यावश्यक सेवेअंतर्गत येतात. नागरी सुविधा देण्यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 45 हजार 111 इतकी निश्चित केली होती. मात्र कालांतराने मुंबईची लोकसंख्या वाढल्याने अतिरिक्त खाती सुरू झाली. मात्र त्या विभागांसाठी नव्याने भरती केली नाही. तसेच विविध कारणांमुळे रिक्त कर्मचाऱ्यांची शेड्यूल पदेही अनेक वर्षापासून भरलेली नाहीत. त्यामुळं हा रिक्त पदांचा आकडा वाढला आहे. यामुळे महापालिकेचे प्रशासक व आयुक्त भूषण गगराणी यांनी वेळीच लक्ष देऊन भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे संजय कांबळे-बापरकर यांनी केली आहे.
मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची मान्यता; तुतारीलाही ग्रीन सिग्नल
रिक्त पदांचा तपशील-
सरळसेवेती – 38 हजार 107
पदोन्नती – 9 हजार 295
एकाकी पदे – 572
अतिविशेष पदे – 92
सफाईगार – 4 हजार 155
सेवानिवृत्तीमुळे आणखी ताण…
यंदा महापालिकेतील सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांसह इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त होत असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येणार आहे.