Sharad Pawar : ‘काँट्रॅक्ट भरती’ पवारांच्या निशाण्यावर, म्हणाले, आता…

Sharad Pawar : ‘काँट्रॅक्ट भरती’ पवारांच्या निशाण्यावर, म्हणाले, आता…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून मुंबईत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. सरकारी नोकरीत रिक्त पदांची संख्या जास्त आहे. काँट्रॅक्ट पद्धतीने भरती करू असं सरकार म्हणतंय. जर असं झालं तर त्यात आरक्षण नाही. गरीब वर्ग अधिकारापासून वंचित राहिल. महिलांना संधी मिळणार नाही. यासाठी विरोधाचा कार्यक्रम घेऊन आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

पवार पुढे म्हणाले, आपल्याला आगामी काळात काही कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत. महिला आरक्षण, महागाई असे काही मुद्दे आहेत. संरक्षण खात्यात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या निर्णयाला विरोध झाला. मात्र मी स्वतः मंत्री होतो म्हणून तो निर्णय घेतला आता तुम्हाला महिलाही सैन्यात दिसत आहेत. ही जमेची बाजू एकीकडे आहे तर दुसरीकडे मात्र मणिपूरसारखी घटनाही समोर येते. त्यामुळे आता आपल्यालाच जागरूक राहावं लागणार आहे. जर असा प्रकार कुठं घडला तर आपल्या भगिनींनी रस्त्यावर उतरायला हवं. होऊन काय होईल, ते केस टाकतील. पण, काळजी करू नका सरकार बदलत असते आणि आपण त्या केस काढून टाकत असतो.

Lalit Patil Drugs Case प्रकरणी ससूनच्या डीनला सहआरोपी करा; सुषमा अंधारेंची मागणी

तुमच्या परिसरातील मुलांना प्राथमिक शिक्षणातून बाजूला करण्याचा सरकारचा डाव तो आपल्याला हाणून पाडायचा आहे. समाजात काही चुकीचं दिसत असेल तर रस्त्यावर उतरा, सरकार केस टाकील पण, घाबरू नका. सरकार बदलत असतं. आपण त्या केस मागे घेतो, असे शरद पवार म्हणाले.

शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम, शरद पवार संतापले

शाळा खासगी कंपनीला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शाळा कंपनीच्या सीएसआर फंडातून चालवा असं सरकारचं म्हणणं आहे. नाशिक जिल्ह्यात एका मद्य तयार करणाऱ्या कंपनीने शाळा दत्तक घेतली आहे. त्यांनी त्या शाळेत गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला. आता हा आदर्श आपण मुलांसमोर ठेवणार आहोत का, असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला.  त्यामुळे आता हे पाच कार्यक्रम तुम्ही हाती घ्या. सरकारला धोरणं बदलायला भाग पाडू असं चित्र राज्यात तयार करा, असे आवाहन शरद पवार यांनी मेळाव्यास उपस्थित महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 लोक उरतील तर शरद पवारांचा पक्षही किंचित…; बावनकुळेंचा हल्लाबोल

बेपत्ता महिला, मुलींचा प्रश्न गंभीर

अनिल देशमुखांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न केला. 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या पाच महिन्यांच्या काळात राज्यातून किती महिला, मुली बेपत्ता झाल्या? त्यावर राज्य सरकारने लेखी उत्तर देत सांगितले की 19 हजार 553 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. हा पोलिसांकडे नोंद असलेला आकडा आहे. पण, ज्याची नोंदच होत नाही अशा किती असतील, हे चित्र खूप अवघड आहे. प्रश्न गंभीर आहे. मग, आपण गप्प बसायचं का? असा सवाल करत हे प्रश्न महत्वाचे आहे. महिला आघाडी जागरूक असली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube