दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र देणारे 5 आमदार अन् CM शिंदेंच्या मंत्र्याचा दावा; नेमकं ‘पॉलिटिक्स’ काय?

दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र देणारे 5 आमदार अन् CM शिंदेंच्या मंत्र्याचा दावा; नेमकं ‘पॉलिटिक्स’ काय?

NCP Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (Election Commission) मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना जोरदार धक्का बसला. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांकडे 41 तर शरद पवार यांच्याकडे 15 आमदार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडे जी प्रतिज्ञापत्रे देण्यात आली आहेत त्यात पाच आमदारांनी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्रं दिल्याची माहिती समोर आली आहे. या व्यतिरिक्त एका खासदाराने दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं आहे.

यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी काल केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पाच आमदारांपैकीच तर कुणाला मंत्रिपदावर संधी मिळणार नाही ना अशी चर्चा सुरू आहे. परंतु हे पाच आमदार कोण आहेत याची माहिती मात्र अजून मिळालेली नाही.

Sanjay Raut : ‘निवडणूक आयोग मोदी-शहांच्या मालकीचा, त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादीची’.. राऊतांचा घणाघात

मंत्री केसरकरांचा दावा काय ?

या पाच आमदारांनी जर अजित पवार गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांसाठी हा आणखी एक धक्का ठरणार आहे. या आमदारांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. त्यामुळे प्रत्येक आमदाराकडे सध्या संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. निवडणूक आयोगाला दोन्ही गटांकडून प्रतिज्ञापत्र देणारे आमदार आणि खासदार नेमके कोण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळात अजित पवार गटाने जागा रिक्त ठेवल्याचे म्हटले होते. मग आता या पाच आमदारांपैकीच कुणाची वर्णी मंत्रिपदी लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

दोन्ही गटांकडे किती आमदार-खासदार?

संख्याबळाचा विचार केला तर सध्या अजित पवार गटाकडे महाराष्ट्रात 41, नागालँडमध्ये 7 आमदार, झारखंडमध्ये 1, महाराष्ट्र विधानपरिषदेचे 5 आमदार आणि राज्यसभेत 1 खासदार आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडे महाराष्ट्रात 15 आमदार, केरळ 1 आमदार, महाराष्ट्र विधानपरिषदेत 4 आमदार, लोकसभेत 3 खासदार आणि राज्यसभेतही 3 खासदार आहेत.

जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडली होती. अजित पवार आमदारांचा मोठा गट घेऊन बाहेर पडले होते. त्यानंतर दोन्ही गटांतील वाद निवडणूक आयोगात गेला होता. या वादात निवडणूक आयोग काय निर्णय देणार याची उत्सुकता होती. शरद पवार यांनी स्वतः निवडणूक आयोगात हजेरी लावली होती. त्यामुळे शिवसेनेपेक्षा काही वेगळा निकाल लागेल का अशीही चर्चा होती. मात्र आयोगाने काल पक्षचिन्ह आणि नाव दोन्हीही अजित पवार गटाला बहाल केलं.

Sharad Pawar : शरद पवार गटाचं पक्षचिन्ह अन् नाव ठरलं; ‘या’ नावांतून एक होणार फायनल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज