ठाकरेंच्या ‘मातोश्री’बाहेर घातपात होणार, पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी फोन, पोलीस यंत्रणा सतर्क

  • Written By: Published:
ठाकरेंच्या ‘मातोश्री’बाहेर घातपात होणार, पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी फोन, पोलीस यंत्रणा सतर्क

Uddhav Thackeray News : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. या नंतर एकच खबळबळ उडाली आहे. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

बिग बीं’नी यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा! 

प्राप्त माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ मुस्लिम लोकांचे संभाषण ऐकून कॉलरने कंट्रोल रूमला ही माहिती दिली. मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या व्यक्तींच या फोन करणाऱ्या व्यक्तीने संभाषण ऐकलं. हे बोलणं ऐकून ही व्यक्ती हादरली. या व्यक्तीने उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मोठा घातपात होणार असल्याचं ऐकलं. यानंतर या व्यक्तीने तत्काळ महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली.

कतरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; रिलीजच्या 3 दिवशी केली एवढी कमाई 

मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४-५ मुस्लिम व्यक्तींचे संभाषण ऐकले. या संभाषणातील मुद्दे या व्यक्तीने पोलिसांना कळवले. मुस्लिम तरुण उर्दू भाषेत संवाद साधत होते. ते तरुण मोहम्मत आली रोड येथे रूम रेंटवर घेणार असल्याचं निंयत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं आहे. या माहितीनंतर मुंबई पोलीस अलर्ट झालेत.

मुंबईत बॉम्ब ठेवल्याची माहिती
तामिळनाडू पोलीस नियंत्रण कक्षाला मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. मुंबईत बॉम्बच्या ठेवल्याच्या धमकीचा कॉल आल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष आणि राज्य पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. मुंबईत बॉम्बच्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

यापूर्वी मातोश्रीला उडवून देण्याची धमकी
याआधीही उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर धमकीचा निनावी फोन आला होता. फोन करणार्‍याने आपण दाऊद टोळीचा हस्तक असल्याचा दावा करत आपण मातोश्री निवासस्थान उडवून देऊ, उद्धव ठाकरेंना जीवे मारू, अशी धमकी दिली होती.

दरम्यान, आता पुन्हा एकदा मातोश्रीबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन पोलिसांना आल्यानं काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जाते. मातोश्रीबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube