आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात घसरण; निफ्टी 24,800च्या वर, कोणते शेअर्स आहेत तेजीत?

  • Written By: Published:
आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात घसरण; निफ्टी 24,800च्या वर, कोणते शेअर्स आहेत तेजीत?

Share Market : आज  भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. (Share Market) निफ्टी 60 अंकांपेक्षा अधिक घसरणीसह व्यवहार करत होता. त्याच वेळी, सेन्सेक्स देखील सुमारे 215 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला. बँक निफ्टीही 160 अंकांनी घसरत होता. मिड आणि स्मॉल कॅप शेअर्सही कमकुवत झाल्याचं दिसून आलं. तर PSU शेअर्समध्ये घसरण झाली.

पुण्यात पुन्हा ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’चा थरार! मद्यधुंद ड्रायव्हरने ४ ते ५ वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू

आशियाई बाजारात काय स्थिती?

शुक्रवारी अमेरिकेतील रोजगार आर्थिक डेटा समोर आल्यानंतर, वॉल स्ट्रीटवरील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 1 टक्क्यांहून अधिक घसरले, S&P 500 सुमारे 1.75 टक्क्यांनी घसरले आणि Nasdaq 2.5 टक्क्यांहून अधिक घसरले. त्यानंतर आज आशियाई बाजारात मोठे नुकसान दिसून येत आहे.

जपानचा निक्केई निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. टॉपिक्स निर्देशांक 2.67 टक्क्यांनी घसरला आहे. कोरियाचा कोस्पी जवळजवळ सपाट आहे, तर चीनचा शांघाय कंपोझिट 0.58 टक्के आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 1.15 टक्क्यांनी घसरत आहे.

भीषण अपघात! तेल टँकर अन् ट्रकची धडक, अपघातात 48 जण ठार; तर सुमारे 50 गुरे जिवंत जळाली

सुरुवातीच्या सत्राची स्थिती

व्यवहाराच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत सेन्सेक्सवरील आयटी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. TCS, Infosys सारखे शेअर्स प्रत्येकी 1% पेक्षा जास्त घसरले होते. मात्र, काही वेळातच या आयटी शेअर्सनी रिकव्हरी दाखवली आणि ते ग्रीन झोनमध्ये आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube