Video : अजितदादांचा मूड बदलला! वडेट्टीवारांंसाठी खास शायरी अन् खळखळून हसलं सभागृह…

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत आज (दि.5) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देत आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 07 05T132043.575

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत आज (दि.5) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देत आहे. यावेळी इतरवेळी स्पष्टवक्ते दिसणारे अजितदादा मात्र वेगळ्या मूडमध्ये दिसून आले. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलताना अजितदादांचा शायराना अंदाज बघायला मिळाला. त्यांच्या या शेरोशायरीनंतर सभागृहातील नेत्यांनी आणि आमदारांनी त्यांना खळकळून हसत दाद दिली. (Ajit Pawar Special Shayari For Vijay Waddetiwar)

अखेर ठाकरेंनी महायुतीला भगदाड पाडलचं; रविवारी शिंदेंसह अनेकांचे ठाकरे गटात ‘Out Going’

सभागृहात नेमकं काय घडलं?

अजित पवारांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवत अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणांनंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर मोठी टीका केली जात आहे. या सर्व टीकांवर सभागृहातील विरोधी नेते वडेट्टीवरांकडून अनेक सूचना देण्यात आल्या. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, विजयरांवांनी त्यांच्या भाषणामध्ये चांगले मुद्दे आणि सूचना मांडल्या आहेत. त्यांना तेवढ्याच सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देण्याचा महायुतीची भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले.

अन् अजितदादांमधला शायर जागा झाला

अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांनी दिलेल्या सूचनांचे कौतुक करताना अजितदादांनी त्यांना तेवढ्याच सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देणार असल्याचा शब्द दिला. तसेच चांगल्या सूचनांबद्दल तुम्हाला काही तरी ऐकवतो असे अजितदादा म्हणाले अन् त्यांनी ‘प्यार करेंगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाएंगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिले तो गले मिलाएंगे सितम करेंगे तो सितम करेंगे हम आदमी है तुम्हापरे जैसे जो तुम करोगे वो हम करेंगे’ अशी थेट शायरी म्हणून दाखवलीय दादांच्या या शायराना अंदाजावर सभागृहातील नेत्यांनी खळखळून हसत दाद दिली.

आमदारांचा निरोप समारंभ अन् देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले, जयंत पाटील हे कधी आमच्या …

मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो

वडेट्टीवारांसाठी खास सादर केलेल्या शायरीनंतर उपस्थितांनी हसत टेबल वाजवत अजितदादांना साद दिली. त्यावेळी समोर बसलेल्या कुणीतरी अजितदादांचा मूड बदललेला दिसतो असे ऐकवले. त्यावर दादांनी लगेच चांगला मूड झाला तरी वाईट वाटतंय काय कठीणटं आहे बुआ असे म्हणत जबाबदारी वाढली की मूड बदलावा लागते असे सांगितले.

follow us