मुंबई अदानींच्या घशात घालण्यासाठी मुंडेंचीही बदली; धारावी प्रकल्पावरून वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
Vijay Vadettiwar Aggressive on Dharavi Project : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विविध विषयांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. त्यामध्ये आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी धारावी विकास प्रकल्पावरून (Dharavi Project) सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई अदानींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. तसेच त्याला विरोध करणाऱ्या मुंडेंचीही बदली करण्यात आल्याचे गंभीर आरोप धारावी प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी केली.
अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवेंचं निलंबन मागे, शिवीगाळ प्रकरणात झाली होती कारवाई
विधानसभेमध्ये धारावी प्रकल्पावरून वडेट्टीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ते म्हणाले की, मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. बिल्डरांच्या घशात घातली जात आहे. यातून मुंबईला कोण वाचवणार? यामध्ये धारावी प्रकल्पामध्ये अगोदर साडेपाचशे एकर जागा दिली. त्यानंतर 1203 एकर जागा दिली.
Hina Khan : किमोथेरेपी आधी अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील…
मात्र भाजपचा नीट बोलता येत नाही. जरा तोत्रच बोलणारा नेता म्हटला की, एक इंच ही जागा दिली नाही. मात्र मिठागराची जागा देखील बिल्डरला देण्यात आली. त्यानंतर दुग्ध शाळेची जमीन देखील देण्यात आली. ही सर्व जागा आदानींना हस्तांतरित करण्यात आली आहे. तर ही जागा देण्यास विरोध केल्याने तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले.
मात्र भाजपचा नीट बोलता येत नाही. जरा तोत्रच बोलणारा नेता म्हटला की, एक इंच ही जागा दिली नाही. मात्र मिठागराची जागा देखील बिल्डरला देण्यात आली. असं म्हणत वडेट्टीवार यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील टीका केली. दरम्यान सोमय्या यांच्याकडून नेहमीच विरोधी पक्षातील विविध नेत्यांच्या गैरव्यवहारांवर पत्रकार परिषदा घेत आरोप केले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत.