2 वेळा मुख्यमंत्री… पाच वेळा खासदार, वसुंधराराजेंची राजस्थानवर ‘जादू’
Vasundhara Raje : राजस्थान विधानसभा निवडणूक (Rajasthan Election 2023) जाहीर झाल्यापासून दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थान निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत चेहरे म्हणजे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot), माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) आणि सचिन पायलट (Sachin Pilot). एकवेळ या निवडणुकीपासून बाजूला ढकलेल्या वसुंधराराजेंकडे पुन्हा केंद्रस्थानी आल्या आहेत.
माहेरकडून निवडणूक हरल्या
ग्वाल्हेरच्या माजी राजकन्या आणि धोलपूरच्या महाराणी वसुंधरा राजे यांनी राजेशाहीतून बाहेर पडून राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 5 वेळा आमदार, 5 वेळा खासदार आणि 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे माहेरकडून पहिली निवडणूक हरल्या होत्या. त्यानंतर सासरकडून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या राजे यांचे नाव भाजपच्या आघाडीच्या महिला नेत्यांमध्ये घेतले जाते.
Maratha Reservation : मराठा अन् कुणबी नोंदीचा घोळ! भाऊ मराठा तर बहीण कुणबी…
एक वर्षात घटस्फोट
मुंबईत जन्मलेल्या वसुंधरा राजे या ग्वाल्हेर राजघराण्यातील कन्या आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव जिवाजीराव सिंधिया आणि आईचे नाव विजया राजे सिंधिया आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते माधवराव सिंधिया यांच्या त्या बहीण आहेत. राजे यांचा विवाह धौलपूरच्या जाट राजघराण्यात झाला. 1972 मध्ये त्यांचे हेमंत सिंग यांच्याशी लग्न झाले होते. त्यानंतर एका वर्षानंतर वेगळे झाले. वसुंधरा यांचा मुलगा दुष्यंत सिंह त्यांच्या पूर्वीच्या झालावाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आला होता.
राजकीय जीवनाची सुरुवात
वसुंधरा राजे यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली निवडणूक 1984 मध्ये मध्य प्रदेशातील भिंड लोकसभा मतदारसंघातून लढवली. यात त्यांचा पराभव झाला. राजे यांचा 1984 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 1985-87 दरम्यान राजे भाजप युवा मोर्चा राजस्थानच्या उपाध्यक्षा होत्या. 1987 मध्ये वसुंधरा राजे राजस्थान प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा झाल्या. त्यांच्या कार्यकुशलता, नम्रता आणि पक्षावरील निष्ठा यामुळे राजे यांना 1998-1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री करण्यात आले.
शरद पवार गटाच्या तिन्ही खासदारांना अपात्र करा, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
सुराज संकल्प यात्रा काढली
ऑक्टोबर 1999 मध्ये वसुंधरा राजे यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला. भैरोसिंग शेखावत उपराष्ट्रपती झाल्यानंतर वसुंधरा राजे राजस्थानमधील भाजप प्रदेशाध्यक्ष बनल्या. 2013 मध्ये गेहलोत सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी त्यांनी सुराज संकल्प यात्रा काढली. यासाठी जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आणि त्या राज्याच्या दुसऱ्या मुख्यमंत्री झाल्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपला. मात्र, वसुंधरा राजे यांनी आपली जागा कायम ठेवली.
Noida Rave Case: ‘अल्विश यादववर कठोर कारवाई करा’, खासदार मेनका गांधीची मागणी
वसुंधरा राजेंनी जातीय समीकरणे मोडली
झालरापाटन विधानसभा मतदारसंघात अनेक जाती आहेत, मात्र येथे वसुंधरा राजे यांना मोठा पाठिंबा आहे. त्या निवडणुकीत उतरताच सर्व जातीय समीकरणे मोडीत निघतात आणि त्यांच्या बाजूने एकतर्फी मतदान होते. त्यामुळेच काँग्रेसच्या बलाढ्य उमेदवारालाही राजेंच्या विरोधात पराभवाला सामोरे जावे लागले. 2013 मध्ये राजे यांनी या जागेवर सर्वात मोठा विजय मिळवला होता आणि त्यांना 1,14,384 मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी चंद्रावत यांचा 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
राजेशाही जीवनशैली
महिलांना आकर्षित करण्यासाठी वसुंधरा राजे ज्या भागात जायच्या त्या भागातील पोशाख परिधान करत असत. वसुंधरा राजेंचा रुबाब पाहून राजस्थानची जनताच नाही तर पक्ष -विरोधी पक्षाचे नेतेही त्यांना विधानसभेत महाराणी म्हणायचे. त्यांच्या राजेशाही जीवनशैलीमुळे अनेकदा त्यांच्यावर टीकेही झाली आहे.